मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शालिनी कोकनट शेल आर्ट

पत्रकार मित्र भूषण मेतर यांनी नारळाच्या करवंटीपासून विविध शोभिवंत वस्तू बनविल्या आहेत. या शोभिवंत वस्तूंच्या उत्पादनाला 'शालीनी कोकनट शेल आर्ट' असे नाव दिले आहे. शोभिवंत वस्त खरेदीसाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शोभिवंत वस्तूंसाठी संपर्क :- भूषण मेतर- 9158953906, 7666104599  

आमचो सिद्धार्थ जाधव

  स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शिकत असताना अनेक नवीन मित्र भेटले. पत्रकारीतेमुळे काँलेजच्या लेक्चरला कमी आणि बाहेर जास्त अशी माझी स्थिती असायची त्यामुळे मित्र मैत्रीणींसोबत फारसा वेळ व्यतीत करायला मिळत नसायचा. तरीही माझा बऱ्यापैकी मित्रपरिवार तयार झाला होता. यातीलच एक मित्र म्हणजे सध्या पोलीस खात्यात कार्यरत असलेला निखिल कुऱ्हाडे हा मित्र. काँलेजमध्ये असताना मी निखिलला सिद्धार्थ जाधव म्हणायचो. कारण निखिलचा चेहरा मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्याशी मिळता जुळता आहे. काँलेज झाल्यावर निखिल पोलीस खात्यात रुजू झाला. त्यानंतर निखिलशी फारसा संपर्क व्हायचा नाही. परंतु अधूनमधून त्याचा फोन, व्हाँटअपवरुन संपर्क व्हायचा. निखिल ज्यावेळी भेटतो त्यावेळी गाडी थांबवून हसतमुखाने चौकशी करतो. निखिलचा गुण मला खूप भावतो. काही दिवसांपूर्वी निखिल मालवण पोलीस स्थानक येथे आला होता. नेहमी प्रमाणे त्याने माझी आपुलकीने चौकशी केली. मालवण पोलीस स्थानकातील सहकारी पोलीस मित्रांशी संग्राम माझा बँचमेट हा अशी आवर्जून ओळख करुन दिली. निखिलची मित्रांविषयी असणारी आपुलकी मला बरच काही सांगून गेली. आणि बरच काही शिकव...