मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाजिक न्याय विभाग सिंधुदुर्गच्यावतीनेअणाव आनंदाश्रय येथे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

जीवनाचा मनमुराद आनंद लुटा ! समाजिक न्याय विभाग सिंधुदुर्गच्यावतीने अणाव आनंदाश्रय येथे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा आरोग्य शिबिर, कायदेविषयक मार्गदर्शन, गीत गायनाचा कार्यक्रम वृद्धत्व ही समस्या नाही तर ती एक अवस्था आहे. वृद्धत्वामध्ये आपल्याला एकटे वाटू शकते. वृद्धत्वाच्या अवस्थेत ज्येष्ठांनी छंद जोपासून जीवनाचा मनमुराद आनंद लुटावा असे प्रतिपादन कणकवली येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रद्धा कदम यांनी अणाव येथील जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे समाजकल्याण विभाग सिंधुदुर्गच्यावतीने आयोजीत ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्यावतीने अणाव येथील आनंदाश्रय येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक म्हणुन श्रद्धा कदम या बोलत होत्या. यावेळी आनंदाश्रयाचे बबन परब, सविता परब, अॅङ मीनाक्षी नाईक, आरोग्य सेविका एस. बी. शिंगाडे, आरोग्यसेवक एम. एस. मुसळे, समुदाय आरोग्य अधिकारी रेश्मा जंगले, समाजकल्याण विभागाच्या कार्यालयीन अधिक्षक ...