मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*राजू दीनदयाळ यांचा उत्कृष्ट समतादूत म्हणून बार्टीकडून गौरव*

मालवण वार्ताहर - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या स्वायत्त संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत क्षेत्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या समतादूत प्रकल्प या प्रकल्पात समतादूत म्हणून कार्य करणाऱ्या वैभववाडी येथील राजू उदय दिनदयाळ यांची कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट समतादूत म्हणून बार्टीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. राजु दिनदयाळ यांनी गाव पातळीवर जाऊन बार्टी तसेच समाज कल्याण विभागाच्या योजनांचा प्रचार केला आहे. तसेच तालुक्यातील लाभार्थींना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. बार्टीच्या रायगड महाड येथील जिल्हास्तरीय कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्कार निवडीबद्दल बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, विभाग व्यवस्थापक सुमेध थोरात, समाज कल्याण सिंधुदुर्गचे सहायक आयुकत संतोष चिकणे, प्रकल्प अधिकारी विजय कदम यांचे राजू दिनदयाळ यांनी आभार व्यक्त केले आहेत.

*पालकांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करावे - संग्राम कासले*

 मालवण वार्ताहर - मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती टिकवण्यासाठी मराठी भाषेतील साहित्याचे वाचन होणे गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी मराठी साहित्यकृती वाचून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पत्रकार व समुपदेशक संग्राम कासले यांनी मालवण न्यायालय येथे मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.       या कार्यक्रमाप्रसंगी सहायक अधीक्षक प्रशासन श्री एस. एन.पालव, सहायक अधीक्षक वित्त श्रीमती एम. एम. मोर्ये आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संग्राम कासले म्हणाले, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आजची युवा पिढी वाचनापासून दूर होत चालली आहे. परंतु या पिढीला पुन्हा वाचन संस्कृतीशी जोडणे आवश्यक आहे. कारण वाचन संस्कृतीच्या माध्यमातून आपण युवा पिढीला मूल्य व संस्कार देण्याचे काम करत असतो. आपल्याला युवा पिढी जर संस्कारक्षम बनवायची असेल तर त्यांना वाचनाची गोडी लावण्याची गरज आहे व त्याची सुरुवात आपण प्रत्येकाने घरातूनच केली पाहिजे.    सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालय आहेत. परंतु या वाचनालयामध्य...

मालवण पत्रकार समितीच्यावतीने पत्रकार दिन साजरा

मालवण वार्ताहर मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे जिल्हा पत्रकार संघ कायम असेल, असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यानी केले.               मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार वितरण मसूरे येथील आर पी बागवे हायस्कुल येथे करण्यात आले. यावेळी उमेश तोरसकर हे बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक (मुळीक) परब, माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, साहित्यिका वैशाली पंडित, सिंधुदु...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.

*मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांची पोलीस पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट*

मालवण - वार्ताहर  मालवणचे नूतन तहसीलदार माननीय गणेश लव्हे यांचे मालवण तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मालवण तालुक्यातील तहसीलदार पदाच्या कार्यकालासाठी तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मालवण तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

🌹 *मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर*

⭕ *आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पुरस्कारांचे वितरण* ---------------------------------- ⭕ श्रीगणेश गांवकर (स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार) ⭕  सुधीर पडेलकर (स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार) ⭕ प्रशांत हिंदळेकर ('बेस्ट स्टोरी अवॉर्ड') ⭕ डॉ. ज्योती तोरसकर (मालवण रत्न पुरस्कार) ⭕निलेश गवंडी (कला रत्न पुरस्कार) रविवार 4 जानेवारी सकाळी 11 वा. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल सभागृह येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे होणार वितरण. ----------------------------------- *मालवण तालुका पत्रकार समिती* ▪️दत्तप्रसाद पेडणेकर (अध्यक्ष) ▪️ सचिव कृष्णा ढोलम (सचिव) ▪️विद्याधर केनवडेकर (जिल्हा उपाध्यक्ष) ▪️अमित खोत (जिल्हा कार्यकारणी सदस्य)

मालवणात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार श्री गणेश नागरी सहकारी संस्था मालवण व मालवणी बाजारच्यावतीने सत्काराचे आयोजन

मालवण : श्री गणेश नागरी सहकारी संस्था मालवण आणि मालवणी बाजार संस्थेचे संस्थापक व कागलच्या राजे करमसिंह घाटगे को-ऑप. बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील व बामणी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. अनुराधा पाटील यांच्याहस्ते मालवणच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर व सहकारी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेविका सौ. पूनम चव्हाण, नीना मुंबरकर, मेघा गावकर, सौ. शर्वरी पाटकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी व्ही. बी. पटकारे, बबन गावकर, सतीश कासले, सुचिता धुरी आदी उपस्थित होते.