*तरुणांचा धम्म चळवळीत सहभाग* मे व जून महिन्यात कट्टा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बौद्धाचार्य श्रामनेर प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्याची परीक्षा 27 ऑक्टोबर 2024 रोजी कणकवली येथे संपन्न झाली. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थिमध्ये मी, सचिन कासले, मनोज काळसेकर 34 वयाच्या दरम्यान होतो. बाकी बहुतांश 50 वयाच्या पुढचे होते. एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता तरुण धम्म चळवळीकडे मोठ्या प्रमाणात वळताना का दिसत नाही याचे विचार मंथन होणे गरजेचे आहे. या संदर्भात मी टीव्हीवर नामदेव ढसाळ यांची एक मुलाखत पाहिली होती त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की जे मूल बौद्ध परिवारात जन्मते त्यांना लहानपणापासूनच घरात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो दिसतात. हे फोटो पाहूनच ही मुले लहानाची मोठी होतात. त्यामुळे ज्या महामानवांनी या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले. त्यांचे कार्य पुढे चालवणे ही त्या बौद्ध घरातील कुटुंबातील प्रत...