मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिष्यवृत्ती योजनेसाठी आवाहन

शैक्षणिक वर्ष 2022 - 23 यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर, शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्याबाबत अनुसूचित जाती, इमाव, विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी समाज कल्याण सिंधुदुर्ग (02362 - 228882) तसेच समतादुतांशी संपर्क साधावा. शामल सावंत कणकवली - 9420726374, राजू दिनदयाळ वैभववाडी- 9421235704, सगुण जाधव सावंतवाडी - 7066409995, सुदीप कांबळे देवगड - 9960803301,सुहास मोचेमाडकर दोडामार्ग- 8805269145,  सुजित जाधव वेंगुर्ला - 9422921882, विजय कदम कुडाळ - 9119570426, संग्राम कासले मालवण - 9420824874

भूविकास बँकेच्या कर्जदारासह कर्मचाऱ्यांनाही दिलासा

  राज्यातील भूविकास बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे तब्बल 69 हजार हेक्टरवरील जमीनीचा सात-बारा कोरा होणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणे सरकार देणार असल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ, कॅ. अभिजीत अडसूळ, भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी आभार मानले.