मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बांगडा जेवण

आज दुपारी बांगडा जेवणाचा आस्वाद घेतला. पौर्णिमा सांगलीला असल्याने तिला बांगडा जीवनाचा आस्वाद घेता आला नाही. सांगली वरून आल्यानंतर तिच्यासाठी खास फिश थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे तोपर्यंत ही बांगडा थाळी पाहून मनातून बांगड्या थाळीचा आस्वाद घेता येईल.

दिवंगत सविता संजय जाधव स्मृती प्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ

कणकवली येथील सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत सविता संजय जाधव स्मृती प्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कुणकेरी सावंतवाडी येथील सौ. नीता नितीन सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक शितल किरण कदम (कुडाळ), अक्षय काशीराम सुतार (वैभववाडी), तृतीय क्रमांक माधवी लीलाधर तीरोडकर (मालवण), सुनील शंकर जाधव (देवगड) यांनी प्राप्त केला आहे. स्पर्धेचे परीक्षण डीएड कॉलेजचे प्राध्यापक नागेश कदम यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलेे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 24 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत हळवल, तालुका कणकवली येथे संपन्न झाला. विजेते स्पर्धक व सहभागी स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेे. यावेळी प्रबोधनकार मारुती जोशी, जनी कुमार कांबळे, संजय जाधव, प्रमोद कासले,सुदीप कांबळे, संजय तांबे, अजय कदम, निलेश माळगावकर, उत्तम जाधव, संग्राम कासले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

भंडारी प्राथमिकचे मुख्याध्यापक भगत सर

भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भगत सर आज सेवानिवृत्त होत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भगत सर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. भगत सरांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखे असंख्य विद्यार्थ्यांनी बालपणी अभ्यासाचे धडे गिरवले आहेत. भंडारी एस. सो. हायस्कूल 1996 ते 2022 या वर्षांमधील असंख्य विद्यार्थी भगत सर यांच्यामुळे घडले आहेत..सरांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारा लेख दैनिक तरुण भारत मधून आज प्रसिद्ध झाला आहे. तो लेख सर्वांनी अवश्य वाचावा ही विनंती.

विधवा प्रथा व ग्रामस्थांची भूमिका

भारतीय संविधानातील मूल्ये हि आपल्या दैनदिन जीवनात अत्यंत आवश्यक आहेत. संविधानातील मूल्ये आचरणात आणणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन प्रबोधनकार मारूती जोशी यांनी विधवा प्रथा व ग्रामस्थांची भूमिका या विषयावर हळवल ग्रामपंचायत येथे बोलताना केले.    हळवळ ग्रामपंचायत येथे विधवा प्रथा व ग्रामस्थांची भूमिका या विषयावर मारूती जोशी यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनीकुमार कांबळे, विलास डिके, वंचितचे महासचिव प्रमोद कासले, वंचितचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, संजय तांबे, विजय हरकुळकर, सुषमा हरकुळकर, ग्रा. प. सदस्य उत्तम जाधव, सुदिप कांबळे, तनुजा बागबान, रूपाली उबाळे, उर्वी साटम, अक्षय कदम, अजय कदम, निलेश माळगावकर, दिनेश मोरे, संग्राम कासले आदि उपस्थित होते.   याप्रसंगी बोलताना मारूती जोशी म्हणाले, भारतीय संविधानाने स्त्रियांना सन्मानाचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्रियांनी संविधानातील मुल्ये व तत्वे आचरणात आणली पाहिजे. जुन्या रूढी परंपरेने स्त्रीयावंर बंधने लादली होती. परंतु संविधानाने हि बंधने नष्ट केली. भारताचे संविधानान स...

दिवंगत सविता जाधव यांचा आज प्रथम स्मृतिदिन

कणकवली हळवल येथील सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत सविता संजय जाधव यांचा आज प्रथम स्मृतिदिन. सविता जाधव यांचे आमच्या परिवारातून अचानक जाणे हे आमच्यासाठी धक्कादायक होते. आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या कालावधीत सविता संजय जाधव यांच्या आठवणी सदैव आमच्या सोबत होत्या. सविता जाधव यांचा परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी आम्ही जाधव परिवाराच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम यांच्या आयोजन केले आहे. सविता यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज हळवल ग्रामपंचायत येथे संपन्न होणार आहे. त्याचबरोबर हळवळ ग्रामपंचायत येथे विधवा प्रथा आणि ग्रामस्थांची भूमिका या विषयावर मारुती जोशी काका यांचे प्रबोधन होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन हाच मुख्य हेतू आहे. सविता संजय जाधव यांच्या आठवणी आमच्या मनात कायम राहतील ते या उपक्रमाच्या निमित्ताने.अशा प्रकारचा उपक्रम दरवर्षी घेण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी आम्हा सर्वांना तुमचे सहकार्य अपेक्षित आहे धन्यवा...

अतिउत्साही पर्यटकांना कसे आवरायचे?

मालवण किनारपट्टीवर अतिउत्साही पर्यटकांना कसे अवरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तरुण भारत मधून घेतलेला आढावा.

रॉक गार्डन

मालवण रॉक गार्डन प्रवेशद्वारावर मावळ्यांचे पुतळे उभरण्यात आले आहे. पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरत आहे.

अलिबाग समुद्रकिनारी

2015 मध्ये समतादुत प्रकल्पाच्या निमित्ताने अलिबाग येथे बैठकीसाठी जाणे झाले होते.यावेळी बैठक झाल्यानंतर अलिबाग समुद्रकिनारी मनमुराद फिरण्याचा आनंद लुटला होता. यावेळी माझ्यासोबत पुणे येथील संजय दुबे, दत्ता गायकवाड तसेच रायगड मधील सहकारी होते. यावेळी रायगड मधील सहकाऱ्यांनी दुबे, दत्ता आणि माझा समुद्राच्या पाण्यात टिपलेला हा फोटो. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा अलिबागचा समुद्रकिनारा. या फोटोने त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

दिवंगत सविता संजय जाधव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मृतिदिनानिमित्त शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

दिवंगत सविता संजय जाधव यांच्या प्रथम स्मतिदिनानिमित्त 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता ग्रामपंचायत हळवल तालुका कणकवली येथे शैक्षणिक उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवंगत सविता संजय जाधव स्मृती प्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सौ. नीता सावंत प्रथम

कणकवली येथील सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत सविता संजय जाधव स्मृती प्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कुणकेरी सावंतवाडी येथील सौ. नीता नितीन सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक शितल किरण कदम (कुडाळ), अक्षय काशीराम सुतार (वैभववाडी), तृतीय क्रमांक माधवी लीलाधर तीरोडकर (मालवण), सुनील शंकर जाधव (देवगड) यांनी प्राप्त केला आहे. स्पर्धेचे परीक्षण डीएड कॉलेजचे प्राध्यापक नागेश कदम यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 24 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत हळवल, तालुका कणकवली येथे संपन्न होणार आहे तरी विजेते स्पर्धक व सहभागी स्पर्धकांनी पारितोषिक वितरणास उपस्थित राहावे असे आवाहन संजय जाधव व संग्राम कसले यांनी केले आहे.

रायगड मधील एक आठवण

आज फेसबुक वर सात वर्षांपूर्वीचा रायगड इंदापूर येथील फोटो पाहण्यात आला या फोटोशी अनेक आठवणी जुलै गेलेले आहेत तळा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत समता दूध प्रकल्प मार्फत मी आणि माझा मित्र दत्ता यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसंत सादरीकरण केलं होतं या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळालेला आहे रायगड जिल्ह्यातील काही भाग दुर्गम आहेत त्यामुळे समता प्रबोधन करण्यात अनेक अडचणी येत होत्या परंतु माझा सहकारी दत्ता त्याच बरोबर स्थानिक ग्रामस्थांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आम्हाला सहकार्य करून शाळेचे विद्यार्थी पथनाट्यासाठी उपलब्ध करून दिले त्यामुळे रायगड मधील आजूबाजूच्या भागांमध्ये आम्ही पथनाट्य सादर करू शकलो व भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुत्व हे विचार सर्वांपर्यंत पोहोचू शकलो आज या फोटोच्या निमित्ताने सात वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे.