मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

  सन 2021-22 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जाच्या नुतनीकरणासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हि प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवलरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु असल्याचे दिपक घाटे, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नुतनीकरण 28 फेब्रुवारीपर्यंत करावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील. असे पत्रकात नमूद केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी दूरध्वनी क्र. 02362-228882 येथे संपर्क साधवा.

Pay back to society

  सावंतवाडी आरोंदा पंचशीलनगर येथील कांता विठ्ठल जाधव यांनी नूतन घराचा गृहप्रवेश सोहळा 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजयंतीच्या मंगलदिनी संपन्न झाला. गृहप्रवेश सोहळा व शिवजयंतीचे औचित्य साधून कांता जाधव यांनी गृहप्रवेश सोहळ्यानंतर शिवजयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रबोधन कार्यक्रमात संत राऊळ महाराज काँलेज कुडाळचे प्रा. प्रमोद जमदाडे यांनी शिवराय ते भिमराय या विषयावर प्रबोधन केले. तसेच BIN चे गौतम मोरे यांनी Pay back to society या विषयावर प्रबोधन केले. कांता जाधव यांनी गृहप्रवेश व शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या प्रबोधन कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. Pay back to society या वरील गौतम मोरे यांचे व्याख्यान अतिशय सुंदर झाले. आपण समाजाचे देणे लागतो हि भावना मनात ठेवून परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी चळवळीत काम केले पाहिजे. असा या व्याख्यानाचा गाभाथ होता. कार्यक्रमाच्या शेवटी कांता जाधव यांनी बामसेफच्या निधीस 5000 रुपये आर्थिक मदत Pay back to society हा बाबासाहेबांचा विचार क...

विद्यार्थ्यांला शैक्षणिक फी मिळाल्याचा आनंद

 काल दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास माझ्या मोबाईलची रिंग वाजली. गिरकर नावाच्या पालकांचा फोन होता. ते म्हणाले माझ्या मुलीचा पहिलीचा आरटीईचा फाँर्म बार्टीतर्फे तुम्ही भरला होता. आता माझी मुलगी तिसरीत आहे. तिची शैक्षणिक फि बँक खात्यात जमा झाली. गिरकर पालकांचे ते शब्द ऐकून आनंद झाला. कारण बार्टीच्यावतीने समतादूत दरवर्षी आरटीई 25 टक्के प्रवेशाचे फाँर्म विनामूल्य भरत असतात. त्यामुळे असा एखाद्या पालकांचा फोन आला की आनंद होतो. बार्टीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात समतादूत आरटीई प्रवेशाचे फाँर्म विनामूल्य भरतात. अनेक पालकांना आरटीई 25 टक्के प्रवेशाची फारशी माहिती नसते. परंतु समतादूत पालकांना आरटीईबाबत माहिती देतात. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या व आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांच्या पालकांनी तालुक्यातील समतादूतांशी संपर्क साधून आरटीईचे फाँर्म भरावे. तालुकानिहाय समतादूत - श्यामल सावंत - 9420726374 (कणकवली), राजू दिनदयाळ 9421235704(वैभववाडी), सगुण जाधव 7066409995 (सावंतवाडी), सुदिप कांबळे 9960803301(देवगड), सुहास मोचेमाडकर 8805269145 (दोडामार्ग), सुजित जाधव 9422921882(वेंगुर्ला)...

बार्टीतर्फे आरटीई 25 टक्के प्रवेशाचे फाँर्म विनामूल्य भरण्याचा उपक्रम

 शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने काढलेल्या पत्रकानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिलीत प्रवेश घेणाऱ्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 16 फेब्रुवारी 2022 पासून आरटीई 25 प्रवेशाचे आँनलाईन फाँर्म भरण्याबाबत सुचित केले आहे. आँनलाईन फाँर्म भरताना पालकांना अडचणी येऊ नये यासाठी बार्टीच्या समतादूत प्रकल्पामार्फत समतादूत विद्यार्थ्यांचे फाँर्म विनामूल्य भरतात. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तालुक्यातील समतादूतांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे समतादूतांच्या व्हाँट्सअप क्रमांकावर पाठवावीत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे फाँर्म लवकरात लवकर भरता येतील. तालुकानिहाय समतादूत - श्यामल सावंत - 9420726374 (कणकवली), राजू दिनदयाळ 9421235704(वैभववाडी), सगुण जाधव 7066409995 (सावंतवाडी), सुदिप कांबळे 9960803301(देवगड), सुहास मोचेमाडकर 8805269145 (दोडामार्ग), सुजित जाधव 9422921882(वेंगुर्ला), विजय कदम 9119570426 (कुडाळ), संग्राम कासले 9420824874 (मालवण). विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे 1. व...

मिराज कान्हा रसोईची स्पेशल मिसळ

 आज आमचे मित्र समीर म्हाडगुत यांच्या मिराज कान्हा रसोई हाँटेलमध्ये स्पेशल आँफर असलेल्या मिसळचा आस्वाद घेतला. समीर म्हाडगुत यांनी बनवलेली मिसळ अतिशय सुंदर होती. मिसळचे प्रेझेंटेशनही अतिशय सुंदर होते. त्यामुळे मिसळचा आस्वाद घेताना अतिशय आनंद वाटला. समीर म्हाडगुत यांनी हाँटेलची स्थापना केल्यानंतर ते सातत्याने वेगवेगळे पदार्थ बनवून खवय्यांना उपलब्ध करुन देत असतात. त्यांच्या खवय्येगिरीच्या उपक्रमास शुभेच्छा! खवय्ये प्रेमींनी त्यांच्या मिराज कान्हा रसोईस भेट देऊन नवनवीन खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यावा - संपर्क समीर- 9404944454, मिरा - 9421191533 भरड मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

लोकराजा सुधीर कलिंगण

 दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांचे निधन झाल्याची बातमी आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून समजली. क्षणभरासाठी त्यांनी दशावतारात साकारलेल्या विविध भूमिका डोळ्यासमोर तरळल्या. महाविद्यालयीन जीवनात पत्रकारिता करत असताना मला विरेश देऊलकर यांच्या निवासस्थानी सुधीर कलिंगण यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. या मुलाखतीत सुधीर कलिंगण मनसोक्त बोलले होते. मी त्यांना जुन्या काळातील दशावतार व सद्यस्थितीतील दशावतार यावर प्रश्न विचारला होता. त्यावर सुधीर कलिंगण यांनी दिलखुलास उत्तर देत म्हणाले, बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे. नव्या पिढीला दशावताराकडे आणले पाहिजे. त्यासाठी नवीन गोष्टी दशावतारात  आल्या पाहिजे. तु ट्रिकसीनयुक्त दशावतार बघ तुला नक्कीच आवडेल. सुधीर कलिंगण दशावतारात कोणतीही भूमिका साकाराताना त्या भूमिकेशी एकरूप होत. सुधीर कलिंगण यांचे संस्कृत भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. दशावतार नाटकात सुधीर कलिंगण यांचे संस्कृत ऐकणे ही सुवर्णसंधी असायची. मी अनेक वेळा दशावतार नाटक त्यांचे संस्कृत ऐकण्यासाठी जायचो. सुधीर कलिंगण यांनी दशावतारात सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले. त्यामुळे नवीन पिढीतील अ...