मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आरटीई 25% चे ऑनलाइन फॉर्म बार्टीतर्फे विनामूल्य भरणार

 शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने काढलेल्या पत्रकानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिलीत प्रवेश घेणाऱ्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई 25 प्रवेशाचे आँनलाईन फाँर्म भरण्याबाबत सुचित केले आहे. आँनलाईन फाँर्म भरताना पालकांना अडचणी येऊ नये यासाठी बार्टीच्या समतादूत प्रकल्पामार्फत समतादूत विद्यार्थ्यांचे फाँर्म विनामूल्य भरतात. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तालुक्यातील समतादूतांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे समतादूतांच्या व्हाँट्सअप क्रमांकावर पाठवावीत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे फाँर्म लवकरात लवकर भरता येतील. तालुकानिहाय समतादूत - श्यामल सावंत - 9420726374 (कणकवली), राजू दिनदयाळ 9421235704(वैभववाडी), सगुण जाधव 7066409995 (सावंतवाडी), सुदिप कांबळे 9960803301(देवगड), सुहास मोचेमाडकर 8805269145 (दोडामार्ग), सुजित जाधव 9422921882(वेंगुर्ला), विजय कदम 9119570426 (कुडाळ), संग्राम कासले 9420824874 (मालवण). विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे 1. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड...