*तरुणाईला चळवळीची ओळख निर्माण करून देणे गरजेचे* *डॉ.अमर कांबळे यांचे कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात प्रतिपादन*
मालवण वार्ताहर - बौद्ध धम्म हा एक महान आदर्शवादी धम्म आहे. माणसातील माणूसपण जपण्यासाठी धम्म आवश्यक आहे. त्याचबरोबर धम्म हा विज्ञाननिष्ठा, न्याय, प्रज्ञा, प्रेरणा यासाठी देखील आवश्यक आहे. म्हणूनच एक आदर्श जीवन जगण्यासाठी तरुणांनी ही धम्माची चळवळ पुढे गतिमान करणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी नवीन तरुणाईला चळवळीची ओळख निर्माण करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. अमर कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बोलताना केले. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व महिला शाखा मालवण यांच्यावतीने 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली व प्राध्यापक डॉ. अमर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे संपन्न झाला. याप्रसंगी डॉक्टर अमर कांबळे हे बोलत होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे अध्यक्ष रविकांत कदम, डॉ. अमोल कांबळे,कोषाध्यक्ष सूर्यका...