मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दहा रुपयाचा वडापाव

दहा रुपयाचा वडापाव हे शीर्षक वाचून अनेकांना वेगळं वाटलं असेल. कारण सध्या वडापावचे दर हे वाढलेले आहेत. मी वडाचापाट येथे गेलो असता मला दहा रुपयाला वडापाव असा बोर्ड दिसला. मी त्या दुकानाच्या जवळ गेलो. आणि जवळून वडापाव पाहिले तर वडापाव ची साईज देखील मोठी होती. त्यामुळे मी उत्सुकतेने हॉटेलचे मालक यांना विचारले दहा रुपयाला वडापाव कसा काय? त्यावेळी ते मालक म्हणाले माझं नाव बाळापुर मी पेंडूरचा आहे पण मी मुंबईला असतो लालबाग चिंचपोकळी येथे माझा वडापावचा व्यवसाय आहे. मी दोन रुपयापासून वडापाव विकायला सुरुवात केली होती आज मी विकत असलेल्या वडापावची किंमत दहा रुपये आहे. अनेक जण माझ्याकडचा वडापाव लालबाग चिंचपोकळी येथे आल्यावर आवर्जून खातात. मी देखील दहा रुपयाच्या वडापावचा आस्वाद घेतला अतिशय अप्रतिम होता. तुम्ही कधी लालबाग चिंचपोकळीला गेला तर या वडापावचा आस्वाद अवश्य घ्या. बाळा परब संपर्क 9152141502

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला उपस्थिती

आज सकाळी कोळंब कातवड प्राथमिक शाळा तसेच कोळंब ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.

पपई उपलब्ध आहेत हवे असल्यास संपर्क साधा

आज सकाळी काढलेले पपई उपलब्ध आहेत. कोणाला हवे असल्यास संपर्क साधावा

मुलांना वृत्तपत्र वाचायची सवय लावा - दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते यांचे प्रतिपादन

सोशल माध्यमांच्या युगात वाचनाची आवड कमी होत चालली आहे. घरामध्ये लहान मुले वाचताना दिसत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना मराठी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावणे गरजेचे आहे. वाचनामुळे मुलांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजीत कार्यक्रमाप संगी बोलताना केले. दिवाणी न्यायालय मालवण व मालवण तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते हे बोलत होते. यावेळी पत्रकार संग ाम कासले, सहायक अधिक्षक एम. जी. डीसोजा, एस. एन. पालव आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना देवकते म्हणाले, आज पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे दिसत आहे. परंतु असे असले तरी मराठी भाषेविषयीची मुलांची ओढ कमी होउ देता कामा नये. त्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पालकांनी स्वत वाचनाची सवय लावुन मुलांनाही वृत्तपत्र, पुस्तक वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. याप्रसंगी बोलताना संग्राम...

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक - राजेंद्र पराडकर यांचे प्रतिपादन

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वृत्तपत्रांचे वाचन अतिशय महत्वाचे असते. कारण वृत्तपत्रामधुन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, कला, क्रिडा तसेच इतर घटकांविषयी माहिती उपलब्ध होत असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी रोज वृत्तपत्राचे वाचन करावे असे प्रतिपादन जि. प. चे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पोलीस पाटील पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. मामा वरेरकर नाटयगृह येथे मालवण तालुक्यात पोलीस पाटील पदाच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या मालवण तालुक्यातील उमेदवारांसाठी ओबीसी व आरक्षित महासंघाच्यावतीने मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पराडकर हे बोलत होते. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके, चौके उपसरपंच पी. के. चौकेकर, संग्राम कासले आदि उपस्थित होते. यावेळी राजेंद्र पराडकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हयाच्या इतिहास, भुगोल, महत्वाच्या व्यक्तींची पदे आदिंची माहिती असणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर जिल्हयामध्ये होणा-या महत्वाच्या घटनांची नोंद असणे...

छत्रपती शिवरायांची सागरी राजधानी किल्ले सिंधुदुर्गला भेट

रविवारी बऱ्याच दिवसांनी मी आणि पौर्णिमा हिने छत्रपती शिवरायांची सागरी राजधानी असलेल्या किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. किल्ले सिंधुदुर्ग हा प्रत्येकासाठी अभिमानाचा विषय आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीतून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपणा सर्वांना दिसते. सध्या किल्ले सिंधुदुर्ग मध्ये असलेल्या मंदिरांचे बांधकाम रंगरंगोटी व इतर कामे सुरू आहेत. पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्ग येथे येत आहेत.  किल्ले सिंधुदुर्ग मध्ये गेल्यानंतर नेहमीच आपल्याला प्रेरणा भेटत राहते. ती प्रेरणा असते छत्रपती शिवरायांची. जीवनात किती संकट येऊ पण आपण डगमगून चालणार नाही त्या संकटांचा निर्धास्तपणे सामना करा हेच छत्रपती शिवराय सांगत असतात. पर्यटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे अवश्य केले पाहिजे.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने

स्वतंत्र सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या जयंतीनिमित्त कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग भारतीय लोकशाहीचे भवितव्य, सोशल मीडिया गुरफडलेली आजची तरुण पिढी, चांद्रयान मोहीम अभिमानास्पद पण वाढत्या बेकारीचे काय, शेतकरी राज्यात सुखी लोकशाहीत दुःखी, पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमिका, जागतिक अशांतता धार्मिक व आर्थिक असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. मी या स्पर्धेसाठी सोशल मीडियात गुरफडली आजची तरुण पिढी हा विषय घेतला होता. एकूण दहा मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या बहुतांश स्पर्धकांनी सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुण पिढी हाच विषय घेतला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यस्तरीय स्पर्धेतील स्पर्धक कशा पद्धतीने असतात याची माहिती मिळाली. राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होताना अतिशय वेगळ्या पद्धतीची तयारीने जावे लागते हे देखील लक्षात आले. त्यामुळे आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होताना त्या विषयाच्या सर्व बाज...

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ कडून प्रतिनिधित्व करताना मला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने मी बऱ्याच दिवसांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचे नियोजन व आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटात पंधरा स्पर्धक सहभागी झाले होते. वक्तृत्व स्पर्धा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी स्पर्धा आहे. त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे आवश्यक असते. स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धकांच्या आपल्याला मते समजतात, त्यांची बोलण्याची शैली समजते त्यांनी मांडलेले विषय समजतात. त्यामुळे आपण स्वतःमध्ये काही बदल करू शकतो. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील वक्तृत्व स्पर्धा ही अतिशय महत्त्वाचे आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अवांतर वाचन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर घालण्या...

मुलींना करिअरसाठी कुटुंबातून प्रोत्साहन देणे गरजेचे - विनया कदम यांचे प्रतिपादन

राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा सांगणाऱ्या मुली आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलींची प्रगती होण्यात त्यांचा कुटुंबाचा वाटा महत्वाचा असतो. कुटुंबातील सर्व घटकांनी मुलींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे तरच मुली निर्धास्तपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करीअर करु शकतात असे प्रतिपादन केंद्रशाळा सुकळवाड नं १ च्या शिक्षिका विनया कदम यांनी येथे केले. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा मालवण महिला विभाग यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. सुषमा हरकुळकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्गच्या कार्यक्रम समन्वयक सुषमा साखरे, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र जाधव, तालुकाध्यक्ष सुर्यकांत कदम, सरचिटणीस रविकांत कदम, कोषाध्यक्ष संजय पेंडुरकर, प्रकाश पवार, मिलींद पवार, नचिकेत पवार, शंकर कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर,...

काळ कितीही बदलला तरी जय भीम हाच आमचा पासवर्ड - सिने अभिनेते नीलेश पवार यांचे प्रतिपादन

आजची युवा पिढी थ्रीजी आणि फोरजी आणि त्याच्या पलीकडे विचार करणारी आहे. या युवा पिढीसमोर क्रांती करणारे बाबासाहेब आपल्याला मांडायचे आहेत. त्यासाठी आपल्याला युवा पिढीशी कनेक्ट व्हावे लागेल. कारण आपण फुले, शाहु, आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत. हा वैचारिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. कारण काळ कितीही बदलला तरी जय भीम हाच आमचा पासवर्ड असणार आहे. हे कोणीही विसरुन चालणार नाही असे प्रतिपादन सिनेनाटय अभिनेते निलेश पवार यांनी क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाउ यांच्या संयुक्त जयंती उत्सवाप्रसंगी मालवण येथे बोलताना केले. फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच महिला विभाग मालवण यांच्यावतीने एसटी स्टैंड येथील समाजमंदिर येथे क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाउ यांची जयंती साजरी करण्यात आली. या कायक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना निलेश पवार हे बोलत होत. यावेळी अखिल भारतीय अनिसचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, सभेच्या अध्यक्षा माधुरी जाधव, महिला अध्यक्षा नेहा तांबे, सचिव निकीता मालवणकर, दर्शना गुळवे, राखी मालवणकर...

आज सकाळी पपई काढले आहेत हवे असल्यास संपर्क साधा

9420824874

बहुगुणी पपई हवे असल्यास संपर्क साधा

आमच्या कोळंब येथील श्रावस्ती निवासस्थानी लावलेल्या पपईच्या झाडाला पपई लागले आहेत. पपईची आवश्यकता असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा 9420824874

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा

पत्रकार दिनाचे औचित्य साधून मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मालवण मधील पत्रकारांना मालवण पोलीस ठाणे येथे निमंत्रित केले होते. यावेळी मालवण शहरातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे व उपस्थित पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ॲट्रॉसिटी कायद्याबाबत माहिती जाणून घ्यावी- सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर यांचे साळेल व चौके येथे प्रतिपादन

 सोशल माध्यमांमधुन अँट्रासिटी कायदयाबाबत वेगवेगळया पोस्ट किंवा मॅसेज फिरत असतात. त्यामुळे या कायदयामध्ये काही बदल झाला आहे का अशी शंका नागरिकांच्या मनामध्ये येते. परंतु अशा प्रकारच्या संदेशांवर विश्वास ठेवु नका. अॅट्रासिटी कायदयामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. अॅट्रासिटी कायदा हा संवेदनशील व सक्षम असा कायदा आहे. त्यामुळे अॅट्रासिटी कायदयाबद्दल नागरिकांनी माहिती जाणुन घ्यावी असे प्रतिपादन नागरी हक्क संरक्षक पथक प -मुख सहायक पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी साळेल व चौके येथील कार्यक्रमाप -संगी बोलताना केले. या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक एम. डी. चव्हाण, साळेल सरपंच रविंद्र साळकर, उपसरपंच लक्ष्मण परब, ग्रा. प. सदस्य अश्विनी जाधव, सिद्धी परब, पोलीस पाटील रविंद्र गावडे, गणेश गावडे, चौके उपसरपंच पी. के. चौकेकर, विजय चौकेकर, ग्रा. प. सदस्य अनिशा चौकेकर, अॅड. अशोक चौकेकर, स्वप्नील चौकेकर, दादु चौकेकर, नामदेव चौकेकर, संग्राम कासले तसेच साळेल व चौके सम्यनगर येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सहायक पोलीस निरीक्षक संजय डौर म्हणाले, सिंधुदुर्ग ...

पत्रकार दिन आणि मी

सहा जानेवारी हा पत्रकार दिन. पत्रकारांचा हक्कांचा दिवस. सहा जानेवारी रोजी आम्ही मालवण मधील पत्रकार पत्रकार भवन ओरोस येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाभरातून आलेल्या सर्व पत्रकारांची भेट घेता आली. खरोखरच पत्रकार दिनाचा दिवस अतिशय आनंदी वातावरणात गेला. मला महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारितेत काम करण्याची संधी मिळाली. दैनिक रत्नागिरी टाइम्स, तरुण भारत या वृत्तपत्रांमध्ये मला विविध विषयावर लिखाण करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेमध्ये लिखाण करत असतानाच मी माझी शिक्षण घेण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली. या कालावधीत वृत्तपत्र पदवी, एम एस डब्ल्यू, एल एल बी आदींचे शिक्षण मी पूर्ण केले. पत्रकारितेविषयी अनेकांच्या मनात अनेक शंका अनेक प्रश्न असतात. पण खरोखरच ही पत्रकारिता कशी असते. तर माझ्या मते पत्रकारिता ही आनंददायी असते. पत्रकारितेमध्ये तुम्हाला फारसे मानधन मिळत नाही. कारण ही एक प्रकारची समाजसेवा आहे. त्यामध्ये तुम्हाला समाजाचे वेगवेगळे प्रश्न जाणून घेता येतात. त्यावर उपाय किंवा मार्ग तुम्ही...

धुरीवाडा प्राथमिक शाळा येथे बालिका दिन साजरा

धुरीवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित राहून मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. यावेळी शाळेच्या शिक्षिका इजाबेल फर्नांडिस, अंकिता धुरी, ऐश्वर्या धुरी तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. धूरीवाडा जि.प. शाळा येथे दरवर्षी बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. या बालिका दिनाच्या निमित्ताने प्रसाद येथील विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारत असतात.