*बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय* मालवण वार्ताहर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा अंतर्गत आरटीई दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना स्वयंअर्थ सहाय्यशाळा, विनाअनुदानित शाळांसाठी 17 फेब्रुवारी पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी 10 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म विनामूल्य भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीई अंतर्गत स्वयंअर्थसहायित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी 25% राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावीत बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा वंचित घटकात तर आर्थिक वर्षात पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या बालकांचा आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो. पालकांना त्यांच्या निवासस्था...