*बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय*
मालवण वार्ताहर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा अंतर्गत आरटीई दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना स्वयंअर्थ सहाय्यशाळा, विनाअनुदानित शाळांसाठी 17 फेब्रुवारी पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी 10 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म विनामूल्य भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत स्वयंअर्थसहायित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी 25% राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावीत बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा वंचित घटकात तर आर्थिक वर्षात पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या बालकांचा आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो. पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावरील शाळा आरटीई संकेतस्थळावर दिसतील. त्यामधील शाळांची निवड करावी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
बार्टी मार्फत मोफत फॉर्म भरण्याची सोय
सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्यावतीने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म मोफत भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांचे फॉर्म विनामूल्य भरण्यात येणार आहेत ज्या पालकांना आरटीई प्रवेशाचे फॉर्म विनामूल्य भरायचे आहेत त्यांनी तालुक्यातील समतादुतांशी संपर्क साधावा. असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, विभागीय प्रकल्प अधिकारी तेजस्विनी सोनवणे यांनी केले आहे
विजय कदम (प्र. अधिकारी )
9119570426
संग्राम कासले मालवण 9420824874
सुदीप कांबळे देवगड
9960803301
राजू दिनदयाळ वैभववाडी
9421235704
सुजित जाधव वेंगुर्ले
9422921882
सुहास मोचेमाडकर दोडामार्ग
8805269145
सगुण जाधव सावंतवाडी
7066409995
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा