डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती त्यांच्या वनंद या गावी उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनंद येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बार्टी तर्फे 15 टक्के दराने पुस्तक वाटप, उपस्थित लोकांसाठी मोफत भोजन, व संविधान प्रास्ताविका वाटप करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, विधी अधिकारी आयवळे, उपअभियंता आकाश कुऱ्हाडे, प्रकल्प अधिकारी योगेश कोलते, समतादूत विभागाचे रत्नागिरीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी आशिष कांबळे, सिंधुदुर्गचे प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत प्राजक्ता मराठे, सुदीप कांबळे, सुजित जाधव, सुहास मोचेमाडकर, सगुण जाधव, महेश्वरी विचारे, रूपाली बाईत, राजू दीनदयाळ, आदी उपस्थित होते. यावेळी बार्टीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुस्तक वाटप स्टॉलकडे नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जयंतीसाठी आलेल्य...