मालवण - एलआयसी मालवण ब्रांचचे विमा प्रतिनिधी श्री बखत्तीयार खान यांनी 2024 -25 या वर्षांमध्ये सलग तीन वेळा हॅट्रिक करून एमडीआरटी होण्याचा पहिला मान मिळवला आहे. त्याबद्दल त्यांचा एलआयसी मालवणच्या ब्रांच मॅनेजर सतेजा बोवलेकर, विकास अधिकारी शैलेश पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. आज बखत्तीयार खान यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा!