महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेअतंर्गत अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्रय़रेषेखालील भूमीहिन कुटुंबाना चार एकर जिरायती (कोरडवाहू) शेतजमिन किंवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) शेतजमिन उपलब्ध करून देण्यात येते. लाभार्थीचे निवडीचे निकष - 1. लाभार्थी हा अनुसुचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा. 2. लाभार्थी दारिद्रय़रेषेखालील भूमीहिन शेतमजूर असावा. 3. लाभार्थीचे वय किमान 18 वर्षे कमाल व 60 वर्षे असावे. 4. जमिन ज्या गावात उपलब्ध आहे त्याच गावचे रहिवासी अर्ज करण्यास पात्र असतील. 5. ज्या गावात जमिन उपलब्ध आहे त्या गावातील वरील अटी शर्तीमध्ये बसणारे लाभार्थी असे लाभार्थी न मिळाल्यास लगतच्या गावातील व लगतच्या गावातील लाभार्थी उपलब्ध न झाल्यास तालुक्यातील पात्र लाभार्थी याचा विचार करण्यात येईल. 6. महसूल विभगाने ज्याना गायरान व सिलिगच्या जमिनीचे वाटप केलेले आहे. त्या कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार नाहि. लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम 1. दारिद्र...