महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेअतंर्गत अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्रय़रेषेखालील भूमीहिन कुटुंबाना चार एकर जिरायती (कोरडवाहू) शेतजमिन किंवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) शेतजमिन उपलब्ध करून देण्यात येते.
लाभार्थीचे निवडीचे निकष -
1. लाभार्थी हा अनुसुचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.
2. लाभार्थी दारिद्रय़रेषेखालील भूमीहिन शेतमजूर असावा.
3. लाभार्थीचे वय किमान 18 वर्षे कमाल व 60 वर्षे असावे.
4. जमिन ज्या गावात उपलब्ध आहे त्याच गावचे रहिवासी अर्ज करण्यास पात्र असतील.
5. ज्या गावात जमिन उपलब्ध आहे त्या गावातील वरील अटी शर्तीमध्ये बसणारे लाभार्थी असे लाभार्थी न मिळाल्यास लगतच्या गावातील व लगतच्या गावातील लाभार्थी उपलब्ध न झाल्यास तालुक्यातील पात्र लाभार्थी याचा विचार करण्यात येईल.
6. महसूल विभगाने ज्याना गायरान व सिलिगच्या जमिनीचे वाटप केलेले आहे. त्या कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार नाहि.
लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम
1. दारिद्रय़ रेषेखालील भूमीहिन अनूसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील परितक्त्या स्त्रिया.
2. दारिद्रय़रेषेखालील भूमीहिन अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विधवा स्त्रीया.
3. अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसुचित जातीचे अत्याचारग्रस्त.
अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे/दाखले
1. लाभार्थी याचा जातीचा दाखला
2. लाभार्थी याचे दारिद्रय़रेषेखालील दाखला सन 2007 किंवा त्यापुढील यादितील
3. लाभार्थी भूमिहिन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार याचे प्रमाणपत्र
4. लाभार्थी याचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचे प्रमाणपत्र
5. लाभार्थी याचा रहिवासी दाखला
6. लाभार्थी याचा मागील वर्षाचा उत्पनाचा दाखला
7. जमिन लाभार्थी याना विक्री, हस्ताbतरीत लीज अथवा भाडे तत्त्वावर देता येणार नाहि याबाबत हमीपत्र
8. कुटुंबातील कोणतीहि व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
वरील योजनेअंतर्गत ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्रय़रेषेखालील भूमीहिन कुटुंबाना शेतजमिन घेवू इच्छितात त्यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यानी केले आहे.
माहिती संपर्क
विजय कदम 9119570426
संग्राम कासले 9420824874
सगुण जाधव 7066409995
सुजित जाधव 9422921882
सुदिप कांबळे 9960803301
श्यामल सावंत 9420726374
राजू दिनदयाळ 9421235704
सुहास मोचेमाडकर 8805269145

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा