मोबाईल ही माणसासाठी दैनंदिन वापरातील एक महत्वाची वस्तु बनली आहे. मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. परंतु या मोबाईलच्या वापराची दुसरी बाजु देखील पाहणे आवश्यक आहे. मोबाईल व नेटचा वापर करुन होणा-या गुन्हयांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुलांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन नागरी संरक्षण पथक सिंधुदुर्गचे अधिकारी संजय डौर यांनी भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी बोलताना केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, साहित्यिक अजय कांडर, स्कुल क मिटीचे चेअरमन सुधीर हेरेकर, जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, खजिनदार जॉन न होना, मुख्याध्यापक हणमंत तिवले, विद्यार्थी प्रतिनिधी भाग्यश्री लाड, सर्वांगी हाथणकर, प्रकाश कुशे आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय डौर म्हणाले, सायबर क्राईम अंतर्गत सेक्सटॉर्शन व आर्थिक फसवणुकी यामध्ये नोंद होणा-या गुन्हयांची संख्या जास्त आहे. १३ ते १९ वयाची ८५ टक्के मुले पॉर्न साईट पाहतात असा एनसीआरबीचा रिपोर्ट आहे. त्यासाठी मोबाईलमधील ६० ते ७० ...