मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संघर्ष..........

भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संघर्ष.......... आज जिल्ह्यातील वृतपत्रातून भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची व्यथा मांडणारी बातमी प्रसिद्ध झाली. राज्यातील भूविकास बँकेचे सद्यस्थितीतील 1160 कर्मचारी हालाखीचे जीवन जगत आहेत. भूविकास बँकेचे अनेक प्रश्न मी जवळून अनुभवले आहेत. कारण माझ्या वडिलांनी भूविकास बँकेत कर्मचारी म्हणून सेवा बजावली आहे. 1997-98 भूविकास बँकाना करण्यात येणारा कर्जपुरवठा बंद करण्यात आला. यानंतर भूविकास बँकेची आर्थिक स्थिती बिघडत गेली. 1999 -2000 पासून कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित बिघडले. त्यामुळे त्याचा परिणाम भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होऊ लागला. मुलांची शिक्षणे, लग्न, आजारपणासाठी औषधोपचार यासाठी भूविकास बँकेचे अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले. अनेकांना दागिने गहाण ठेवावे लागले. एकिकडे पगार होत नव्हते तर दुसरीकडे घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नव्हती. परंतु याही कठीण परिस्थिती भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. प्रसंगी कर्ज काढून मुलांना शिकवले. 2015 साली भूविकास बँक बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या कठीण कालावधी...

सैनिकहो तुमच्यासाठी

सैनिकहो तुमच्यासाठी   आमची शाळा भंडारी ए. सो. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थीनी दरवर्षी भारतीय सैनिकांसाठी राख्या बनवून पाठवतात. या कार्यक्रमासाठी दरवर्षी प्रा. पवन बांदेकर सर आर्वजून फोन करून भंडारी हायस्कूल येथे बोलवतात. शुक्रवारी कार्यक्रमासाठी सकाळी 11 वाजता मी भंडारी हायस्कूल येथे पोहचलो. कोरोना आजाराची पार्श्वभूमी असतानाही विद्यार्थिनींचे गट बनवून 10,103 राख्या बनविण्यात आल्या. या राख्या पाठविण्याचा कार्यक्रम मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रा. व्ही. जी. खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले, प्रा. पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. देवेंद्र चव्हाण, प्रा. गुरुदास दळवी, प्रा. प्रभुदास आजगावकर, प्रा. गणेश सावंत, प्रा. सुनंदा वाईरकर, प्रा. वैभवी वाक्कर, प्रा. सौ. शिल्पा प्रभू, शिक्षिका चिन्मयी कोयंडे आदी व तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, टेक्नोव्हा मुंबईचे मालक मंगेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन असल्याचे प्रा. बांदेकर यांनी सा...

लेट पण थेट.........

लेट पण थेट......... लेट पण थेट या वाक्याने समतादूत प्रकल्पाच्या पुणे येथील कार्यशाळेत अनेकांच्या मनावर गारुड केल होते. समतादूत प्रकल्पात असणाऱ्या अनेकांना हे वाक्य आजही स्मरणात असेल. आमचा माजी समतादूत सहकारी, पत्रकार आणि सध्या कोकण नाऊ चँनेलचा ब्युरो चीफ साईनाथ गावकरचे हे पेटंट वाक्य. दोन दिवसापूर्वी साईने नवीन फोर व्हीलर गाडी घेतली आणि त्याने सिद्ध केले ते म्हणजे लेट पण थेट. साईसोबत माझी ओळख समतादूत प्रकल्पात झाली. रायगडमध्ये माझ्या सोबत श्रीवर्धन तालुक्यात त्याने समतादूत म्हणून काम केले. साईच्या काही गोष्टी मला आवडत नाहीत त्या म्हणजे उशिरा उठणे, एखाद्या गोष्टीची तयारी फार उशिरा करणे. पण तरीही साई ग्रेट आहे. तो कोणतीही गोष्ट बिनधास्तपणे करतो. ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी लेखणी आणि आता चँनलच्या माध्यमातून तो अन्यायाला वाचा फोडतो. साईचा जनसंपर्क मोठा आहे. जनसंपर्काची व्याप्ती सिंधुदुर्गातच नाही तर ती अनेक जिल्ह्यामध्ये आहे. साई आपले मत एखाद्या व्यक्तीला ठामपणे पटवून देऊ शकतो. त्याचबरोबर तो एखाद्या व्यतीचे तो मतपरिवर्तनही करु शकतो. ज्या माणसांना साई भेटतो त्यांच्या तो थेट ह्दयात ...

परिवर्तनवादी चळवळीतील सहकारी........

परिवर्तनवादी चळवळीतील सहकारी........  बार्टीच्या समतादूत प्रकल्पामुळे मी परिवर्तनवादी चळवळीशी जोडला गेलो. समतादूत प्रकल्पात काम करत असताना सिंधुदुर्गातील विजय कदम व सगुण जाधव या दोन परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी माझी ओळख झाली. कासार्डे येथील विजय कदम हे चळवळीतील निर्भिड कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्षे परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून ते समताप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे मांडायचा हा त्यांचा स्वभाव आहे. तथागत गौतम बुद्ध, डाँ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावरील साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. चळवळीतील  तरुण कार्यकत्यांना ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. चळवळीतील दुसरे सहकारी सावंतवाडी येथील सगुण जाधव. सगुण हा देखील अनेक वर्षे जिल्ह्यात समताप्रबोधनाचे काम करत आहे. सगुणने महाराष्ट्र व गोवा राज्यात अनेक ठिकाणी समताप्रबोधनाचे कार्यक्रम केले आहेत. संत गाडगेबाबा ही व्यक्तीरेखा साकारुन अनेक ठिकाणी समताप्रबोधन करुन सगुणने लोकांची मने जिंकली आहेत. विजय आणि सगुण यांनी आपल्या व्यक्तीगत जीवनात समताप्रबोधनाला महत्वाचे स्थान दिले आहे. समत...

राजगृह - प्रेरणास्थान....

राजगृह - प्रेरणास्थान.... भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी मुंबई दादर येथे राजगृह हे निवासस्थान बांधून घेतले होते. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे. परंतु ऐतिहासिक वास्तू असलेल्या राजगृहावर अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली.  या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात आला. राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने एका संशयितास ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. राजगृह अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनप्रेम सर्वश्रुत आहे. बाबासाहेब यांच्याकडे अनेक पुस्तकांचा संग्रह होता. बाबासाहेबांची ही ग्रंथसपदा राजगृह या निवासस्थानी ठेवण्यात आली आहे. डाँ. आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाने  प्रेरीत होऊन समाजातील अनेक पिढ्या घडल्या आहेत. डाँ. बाबासाहेब आंबेडकर दैनंदिन जीवनात ज्या वस्तू वापरायचे त्या वस्तू राजगृहात सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत. राजगृहाच्या ऐ...

संदर्भासह स्पष्टीकरण....

संदर्भासह स्पष्टीकरण.... काही दिवसांपूर्वी दहावीचे मराठीचे पुस्तक आँनलाईन पाहिले. पुस्तकात संदर्भासह स्पष्टीकरण हा प्रश्न दिसला नाही. त्यामुळे काही शिक्षकांशी चर्चा केली. चर्चेतून असे लक्षात आले की नवीन अभ्यासक्रमात संदर्भासह स्पष्टीकरण या प्रश्नाचा समावेश नाही. मला शालेय जीवनातील संदर्भासह स्पष्टीकरण या प्रश्नाची आठवण झाली. भंडारी हायस्कूलमध्ये असताना आम्हाला काही दिवसांसाठी आव्हाड सर नावाचे शिक्षक शिकवायला आले होते. त्यांनी फळ्यावर संदर्भ, स्पष्टीकरण, वैशिष्ट्ये असे लिहून एक नमुना आम्हाला दाखवला होता. त्यावरुन आम्ही थोडेफार संदर्भासह स्पष्टीकरण लिहायला शिकलो होतो. परंतु खऱ्या अर्थाने  आम्हाला ध्रुवकुमार रानडे सरांनी संदर्भासहित स्पष्टीकरण हा प्रश्न सोडवायला शिकवला. दहावीत रानडे सरांनी आमच्याकडून प्रत्येक पाठ आणि कवितेचा सारांश दोन ते तीन ओळीत लिहून घेतला होता. त्यामध्ये पाठाचे नाव, लेखकाची माहिती, पाठाची थोडीशी माहिती अशा संदर्भाचा समावेश असायचा. सरांनी सर्व पाठ, कविता यांचे लेखक, कवी आमच्याकडे तोंडपाठ करुन घेतले होते. सरांचे असे म्हणणे होते की लेखकाचे नाव पाठ झाले की, लेखकाला पा...

माझ गाव वडाचापाट.....

माझ गाव वडाचापाट..... माझे मुळ गाव वडाचापाट. मालवणपासून 17 किमीवर आहे. वडीलांची नोकरी, आमचे शिक्षण या कारणांमुळे आम्ही मालवण येथे राहिलो. वडाचापाट येथे लहानपणी शाळेला मे महिन्यात सुट्टी असताना आम्ही सर्वजण गावी जायचो. पण त्यानंतर शिक्षण आणि रिपोर्टींगमुळे वडाचापाटला जाता येत नव्हते. गेलो तर एका दिवसातच परत यावे लागे. शनिवारी आजीची औषधे देण्यासाठी वडाचापाटला जाण्याची संधी मिळाली. शनिवारी सकाळी आकाशात पावसाचे वातावरण तयार झाले होते. परंतु सकाळी 9.30 वाजता आकाशात सुर्य दिसू लागला. त्यामुळे मी माझी प्लेझर गाडी बाहेर काढली. मास्क, रेनकोट परिधान करुन वडाचापाटला जाण्यासाठी निघालो. आडारी पूलापासून ते वडाचापाट पर्यंतचा प्रवास निसर्गाच्या सानिध्यातला होता. दोन्ही बाजूला गर्द झाडी, अधूनमधून पडणारा पाऊस, खळाळत वाहणारे ओढे मनात साठवत वडाचापाटला पोहचलो. वाटेत काही ठिकाणी शेतकरी शेताची कामे करताना दिसले. दरमजल करीत मसदे येथे पोहचलो. त्यानंतर आमच्या घरी जाण्यासाठी झरी येथील रस्त्यावर आलो. परंतु वहाळाला भरपूर पाणी आल्याने तिथून जाता आले नाही. त्यामुळे गाडी मागे घेऊन कुंभयातून आमच्या घरी पोहचलो. घरी आजी...

खुशाल बोलते व्हा!.....

खुशाल बोलते व्हा!.....  कोरोना कालावधीत सर्व काही बदलून गेले आहे. अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाले आहेत. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पगार कपातीची तर काहिंवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. या सर्व घटनांचा परिणाम अनेकांच्या मानसिक स्वास्थावर होत आहे. लाँकडाऊन कालावधीत अनेकजणांना नैराश्य आले आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या व्यक्तींना नैराश्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. मालवण येथील बँ. नाथ पै सेवांगणच्या कौटुंबिक सल्ला केंद्राच्यावतीने खुशाल बोलते व्हा हे अभियान सुरु आहे. लाँकडाऊन कालावधीत ज्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. त्या व्यक्ती निर्धास्तपणे बँ. नाथ पै सेवांगण कार्यालय - 02375-251255, 9960247698, 7038041294 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपल्या भावना, समस्या मांडू शकतात. मोबाईलवर संपर्क साधून समस्या मांडणार आहेत. त्यांचा खाजगीपणा जपण्याची खात्री सेवांगणने दिलेली आहे. त्यामुळे संपर्क साधणाऱ्या व्यक्ती निर्धास्तपणे बोलू शकतात. बँ. नाथ पै सेवांगण सातत्य...

आठवणीतील शिक्षिका......

आठवणीतील शिक्षिका...... 30 जून रोजी भंडारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. एस. टिकम, भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका सौ. जे. जे. फर्नांडिस या नियत  वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या . जय गणेश इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका सौ. मेघना जोशी यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. या तीनही शिक्षकांचे मला वैयक्तिक जीवनात तसेच पत्रकारिता, समाजप्रबोधन यासाठी बहुमुल्य सहकार्य लाभले आहे. मी सुरुवात करतो फर्नांडिस मँडम यांच्यापासून. फर्नांडिस मँडम ह्या आमच्या पाचवी ब च्या वर्गशिक्षिका होत्या. त्यांच्या कडक शिस्तीत आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. फर्नांडिस मँडम अतिशय कडक असल्या तरी त्या अतिशय प्रेमळ व मनमिळावू आहेत. पाचवी ब मधील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. कोणी वाईट संगतीत जावू नये याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. आम्ही अभ्यासाव्यतिरिक्त मस्ती करताना दिसलो की, कासले, गावकर बाबांका सांगतलय मस्ती करतास ते' हा फर्नांडिस मँडमचा पेटंट डायलाँग असायचा. मँडमविषयी आमच्या मनात आदरयुक्त भिती असायची अन् अजूनही आहे. पाचवीत असताना आमच्या शाळेची सहल आंबोलीला गेली होती. माझ्या घरी आ...

प्रयोगशील उमेश.......

प्रयोगशील उमेश....... कोरोनाच्या साथीमुळे देशभरात आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक क्षेत्रे बंद अवस्थेत असल्याने अनेकांना आर्थिक चणचण जाणवत आहे. या कालावधीत प्रत्येकाने प्रयोगशील बनणे आवश्यक आहे. म्हणजेच छोटासा का होईल पण उद्योग, व्यवसाय सुरु करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आपल्याला भीषण आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. माझा कणकवली येथील मित्र आणि माजी समतादूत उमेश बुचडे याने कणकवली रेल्वे स्टेशन शेजारी प्रतिकुल परिस्थितीत वडापावचा व्यवसाय सुरु केला आहे. उमेशचा कणकवली व वैभववाडी येथे आँनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगचा व्यवसाय आहे.परंतु मार्च महिन्यापासून लाँकडाऊनमुळे त्याचा पुर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. उमेशने या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतः च उपाय शोधून काढला. त्याने रेल्वेस्टेशन शेजारी वडापावचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या दिवसात त्याला अडचणी आल्या, पण सर्व अडचणींवर मात करत त्याने वडापावचा व्यवसाय सुरु ठेवला आहे. हाँटेल उमेश या नावाने उभारलेल्या हाँटेलमध्ये वडापाव, समोसा, पँटीस, भजी असे पदार्थ नागरिकांना उपलब्ध करुन देत आहे. उमेशने या पदार्थांची किंमतही माफक म्ह...