मुख्य सामग्रीवर वगळा

प्रयोगशील उमेश.......


प्रयोगशील उमेश.......
कोरोनाच्या साथीमुळे देशभरात आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक क्षेत्रे बंद अवस्थेत असल्याने अनेकांना आर्थिक चणचण जाणवत आहे. या कालावधीत प्रत्येकाने प्रयोगशील बनणे आवश्यक आहे. म्हणजेच छोटासा का होईल पण उद्योग, व्यवसाय सुरु करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आपल्याला भीषण आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. माझा कणकवली येथील मित्र आणि माजी समतादूत उमेश बुचडे याने कणकवली रेल्वे स्टेशन शेजारी प्रतिकुल परिस्थितीत वडापावचा व्यवसाय सुरु केला आहे. उमेशचा कणकवली व वैभववाडी येथे आँनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगचा व्यवसाय आहे.परंतु मार्च महिन्यापासून लाँकडाऊनमुळे त्याचा पुर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. उमेशने या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतः च उपाय शोधून काढला. त्याने रेल्वेस्टेशन शेजारी वडापावचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या दिवसात त्याला अडचणी आल्या, पण सर्व अडचणींवर मात करत त्याने वडापावचा व्यवसाय सुरु ठेवला आहे. हाँटेल उमेश या नावाने उभारलेल्या हाँटेलमध्ये वडापाव, समोसा, पँटीस, भजी असे पदार्थ नागरिकांना उपलब्ध करुन देत आहे. उमेशने या पदार्थांची किंमतही माफक म्हणजे दहा रुपये एवढी ठेवली आहे. त्यामुळे त्याने बनवलेल्या पदार्थांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. हे करत असताना उमेशने सोशल डिस्टसिंगचे भान ठेवले आहे. मास्क परिधान करुन तो हा व्यवसाय करतो. त्याच्या या व्यवसायात त्याला कुटुंबातील सदस्यांची साथ आहे. उमेश कोणतीही गोष्ट आपल्या पुरती मर्यादित ठेवत नाही. जी गोष्ट आपल्याला येत आहे, त्याबाबत तो इतरांनी माहिती देतो. त्याच्या डोक्यात सातत्याने आयडियाची कल्पना फिरत असते. लाँकडाऊनच्या काहि महिन्यांपूर्वी उमेशने आपल्या मामे भावाला चिकन 65 ची गाडी उभारुन दिली होती. आज त्याचा मामेभाऊ स्वतः हा व्यवसाय सांभाळत आहे. उमेशच्या सर्वच आयडिया यशस्वी होतात असे नाही. परंतु उमेश थांबत नाही तो सातत्याने नवीन कल्पना राबवून प्रत्यक्षात आणतो व अनेकांना प्रेरणा देतो. तुम्हालाही उमेशकडून एखादी आयडीया हवी असल्यास कणकवली रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या हाँटेल उमेशला अवश्य भेट द्या आणि उमेशने बनवलेल्या वडापावचाही आस्वाद घ्या! 
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.