मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

16 मे रोजी वडाचापाट येथे जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

   भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा वडाचापाट व सिद्धार्थ मंडळ वडाचापाट बौद्धवाडी यांच्यावतीने तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त 16 मे रोजी रात्री 9 वाजता समाजमंदिर वडाचापाट येथे जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत 6 वर्षावरील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार व आकर्षक चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रवेश शुल्क 200 रुपये, नावनोंदणीसाठी संपर्क सचिन कासले (9421573782), संग्राम कासले (9420824874)

वडाचापाट येथे संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा

  भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण अंतर्गत गोळवण विभागाच्यावतीने वडाचापाट समाजमंदिर येथे तथागत गौतमबुद्ध व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव पार पडला. या महोत्सवास भारतीय बौद्ध महासभा सचिव प्रभाकर जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुसूदन डांगमोडेकर, तालुकाध्यक्ष सुर्यकांत कदम, विभागप्रमुख नचिकेत पवार, उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, प्रकाश पवार, अजित कदम, अमित पवार, मिलींद पवार, भगवान जाधव, दिलीप धामापूरकर, सुनित डांगमोडेकर, भानुदय कासले, गौतम पळसंबकर, रमेश कदम, प्रितम जाधव तसेच गोळवण, वडाचापाट, मसदे, मसुरे, डांगमोडे, राठिवडे, चुनवरे, चाफेखोल, डिकवल या गावांचे पदाधिकारी होते. सुत्रसंचालन संग्राम कासले व आभार अविनाश कासले यांनी मानले.

मालवण येथे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर कार्यक्रम अंतर्गत माहिती पुस्तिकेचे वाचन

  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत समाजकल्याण सिंधुदुर्ग व बार्टी समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तहसील प्रशासनाच्या सहकार्याने तहसील कार्यालय मालवण येथे समाजकल्याण व बार्टीच्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी आमदार वैभव नाईक, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विजय यादव, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावर, मंदार केणी, हरी खोबरेकर, नितीन वाळके, बाबी जोगी, किसन मांजरेकर, महेश जावकर, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब,  निलम शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी संग्राम कासले यांनी बार्टी व समाजकल्याणच्या योजनांची माहिती सांगितली. आमदार वैभव नाईक यांनी बार्टी व समाजकल्याणच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. समाजकल्याण आयुक्त दिपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला.