आस्था ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन ही माझ्या ब्लॉग वरील शंभरावी पोस्ट होती. १०० व्या पोस्टचा हा प्रवास अतिशय रंजक असा आहे. कोरोना कालावधीत मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कारण कोरोना कालावधीत वेळेची उपलब्धता होती. त्यामुळे वेळेचा सदुपयोग होण्यासाठी व काहीतरी वेगळं करावं या हेतूने मी ब्लॉग घेण्यास सुरुवात केली. माझा पहिला ब्लॉग माझा मित्र भालचंद्र ठाकूर याच्यावर लिहिला त्यानंतर ब्लॉग लिहिण्याचा प्रवास सुरूच राहिला. या ब्लॉगमध्ये व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, संस्मरणीय घटना यांचा समावेश होता. परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे ब्लॉगमध्ये सातत्य ठेवणे शक्य झाले नाही. कधी कधी माझ्याकडून दिवसातून एक ब्लॉग घेण्याचा प्रयत्न व्हायचा तर कधी कधी बऱ्याच दिवसांनी ब्लॉक लिहीन होऊ लागलं. परंतु आता नवीन मोबाईल घेतल्यामुळे ब्लॉगमध्ये नियमितपणा येऊ लागला आहे. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने ब्लॉग लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण ज्या वातावरणात घडतो, ज्या समाजातून घडतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे त्याची नोंद कुठेतरी असणे आवश्यक आहे. इतिहासात मागे वळून पाहतान...