कुडाळ तालुक्यातील बाव या गावात लुंबिनी बुद्ध विहार आहे. कुडाळ बस स्थानक येथून कुडाळ बाव अशी एसटी जाते. या एसटीमध्ये बसून आपण बाव येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे येऊ शकता. कुडाळnबाव हे अंतर साधारण सात ते आठ किलोमीटर एवढे आहे. आपल्याकडे दुचाकी असल्यास किंवा फोर व्हीलरने आपण कुडाळ बाव बुद्ध विहार येथे येवू शकतो. अतिशय छोटसं असणार आहे बुद्ध विहार सुंदर आहे. विहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची अतिशय प्रसन्न अशी मूर्ती आहे. त्याचबरोबर तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा व भारतीय संविधानाची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सर्वांचं लक्ष वेधून घेते. बुद्ध विहारांमध्ये अतिशय शांततेच व प्रसन्नतेचे वातावरण असते. बुद्ध विहाराच्या आजूबाजूचा परिसर निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. बुद्ध विहारांमध्ये विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम केले जातात. त्यामुळे या बुद्ध विहाराला आपण सर्वांनी आवर्जून भेट द्यावी.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा