मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मालवण येथे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा

आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून गरजेचे आहे. त्यांनी त्याकाळी हाल अपेष्टा सोसून आपल्यासाठी करून ठेवलेले कार्य  लक्षात घेणे आणि त्यांच्या विचारांनुसार आपण समाजासाठी काय करू शकतो, हे ठरविणे महत्वाचे आहे. आज डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार वर्ग चालविले पाहिजेत. डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेचा वारसा घराघरात आला पाहिजे, असे प्रतिपादन ऍड. वैशाली डोळस यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच तर्फे आज मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा झाला. यनिमित्त सकाळी मालवण एस.टी. स्टॅन्ड मागील समाज मंदिर येथे पूजा पाठ करण्यात आला. त्यानंतर एस.टी. स्टॅन्ड येथून भरड ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते बांगीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात आली. पुष्पहारांनी सजविलेली डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा, निळे झेंडे, निळे फेटे, डीजेच्या तालावर वाजणारी भीमगीते या रॅलीचे आकर्षण ठरले. या रॅलीत आमदार वैभव नाईक यांनीही सहभाग दर्शवीला...

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत किशोर वालावलकर प्रथम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी आणि फुले शाहू, आंबेडकर, विचार मंच मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 28 स्पर्धकांनी आपले निबंध पाठवले होते. यामधून प्रथम क्रमांक किशोर अरविंद वालावलकर (सावंतवाडी) यांनी प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक श्रद्धा सूर्यकांत कदम (कणकवली), तृतीय क्रमांक नीता नितीन सावंत (सावंतवाडी) साहिल रघुनाथ कासार, उत्तेजनार्थ क्रमांक विजय राघव ठाकूर (कुडाळ), सानिका जगदीश वायंगणकर (मालवण) यांनी प्राप्त केले आहेत. निबंध स्पर्धेचे परीक्षण संग्राम कासले यांनी केले. निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ 9 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बॅ. नाथ सेवांगण मालवण येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन सेवांगण, समाज कल्याण विभाग, बार्टी, व फुले, शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.