मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*डी.एड. कॉलेज मालवण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

*डी.एड. कॉलेज मालवण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा* मालवण : डी.एड. कॉलेज मालवण येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्रा. सौ. पूर्वा शिरसाट, प्रा. सौ. आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी, कन्याशाळेच्या शिक्षिका सौ. करलकर, बार्टीचे समतादूत संग्राम कासले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य दत्तात्रय माळी यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डी.एड. महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कन्याशाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, शिस्त आणि सकारात्मक विचारांची जाणीव निर्माण झाली. कार्यक्रम यशस...
अलीकडील पोस्ट

*सामाजिक न्यायाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर* डॉ.बबन जोगदंड विभागप्रमुख, बार्टी,पुणे9823338266

*सामाजिक न्यायाचे जनक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. विविध विषय अभ्यासले, हाताळले. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे त्यांनी वंचित, उपेक्षित समूहाला तर माणसात आणण्याचं काम केलाच;शिवाय या देशातील सर्व लोकांना समान दर्जा,समान संधी,समान न्याय कसा मिळेल या साठी काम केलं, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तर आहेतच, त्याचबरोबर ते खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे शिल्पकार व सामाजिक न्यायाचे जनक आहेत. हा त्यांचा पैलू मानवी जीवनाच्या परिवर्तनामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांना घटनात्मक अधिष्ठान दिले. जे आरक्षण, मूलभूत अधिकार सामाजिक व शैक्षणिक सोयी या पासून वंचित आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करून त्यांनी या शोषित, वंचित, पिडित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं महान कार्य केलं. आजही सामाजिक न्यायाच्या प्रत्येक चळवळीचा पाया बाबासाहेबांच्या विचारावर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म,...

*बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय*

*बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय*  मालवण वार्ताहर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा अंतर्गत आरटीई दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना स्वयंअर्थ सहाय्यशाळा, विनाअनुदानित शाळांसाठी 17 फेब्रुवारी पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी 10 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म विनामूल्य भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.        आरटीई अंतर्गत स्वयंअर्थसहायित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी 25% राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावीत बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा वंचित घटकात तर आर्थिक वर्षात पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या बालकांचा आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो. पालकांना त्यांच्या निवासस्था...

*राजू दीनदयाळ यांचा उत्कृष्ट समतादूत म्हणून बार्टीकडून गौरव*

मालवण वार्ताहर - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या स्वायत्त संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत क्षेत्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या समतादूत प्रकल्प या प्रकल्पात समतादूत म्हणून कार्य करणाऱ्या वैभववाडी येथील राजू उदय दिनदयाळ यांची कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट समतादूत म्हणून बार्टीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. राजु दिनदयाळ यांनी गाव पातळीवर जाऊन बार्टी तसेच समाज कल्याण विभागाच्या योजनांचा प्रचार केला आहे. तसेच तालुक्यातील लाभार्थींना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. बार्टीच्या रायगड महाड येथील जिल्हास्तरीय कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्कार निवडीबद्दल बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, विभाग व्यवस्थापक सुमेध थोरात, समाज कल्याण सिंधुदुर्गचे सहायक आयुकत संतोष चिकणे, प्रकल्प अधिकारी विजय कदम यांचे राजू दिनदयाळ यांनी आभार व्यक्त केले आहेत.

*पालकांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करावे - संग्राम कासले*

 मालवण वार्ताहर - मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती टिकवण्यासाठी मराठी भाषेतील साहित्याचे वाचन होणे गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी मराठी साहित्यकृती वाचून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पत्रकार व समुपदेशक संग्राम कासले यांनी मालवण न्यायालय येथे मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.       या कार्यक्रमाप्रसंगी सहायक अधीक्षक प्रशासन श्री एस. एन.पालव, सहायक अधीक्षक वित्त श्रीमती एम. एम. मोर्ये आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संग्राम कासले म्हणाले, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आजची युवा पिढी वाचनापासून दूर होत चालली आहे. परंतु या पिढीला पुन्हा वाचन संस्कृतीशी जोडणे आवश्यक आहे. कारण वाचन संस्कृतीच्या माध्यमातून आपण युवा पिढीला मूल्य व संस्कार देण्याचे काम करत असतो. आपल्याला युवा पिढी जर संस्कारक्षम बनवायची असेल तर त्यांना वाचनाची गोडी लावण्याची गरज आहे व त्याची सुरुवात आपण प्रत्येकाने घरातूनच केली पाहिजे.    सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालय आहेत. परंतु या वाचनालयामध्य...

मालवण पत्रकार समितीच्यावतीने पत्रकार दिन साजरा

मालवण वार्ताहर मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे जिल्हा पत्रकार संघ कायम असेल, असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यानी केले.               मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार वितरण मसूरे येथील आर पी बागवे हायस्कुल येथे करण्यात आले. यावेळी उमेश तोरसकर हे बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक (मुळीक) परब, माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, साहित्यिका वैशाली पंडित, सिंधुदु...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.