मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भंडारी हायस्कूल

 भंडारी हायस्कूलमध्ये मी तिसऱ्या इयत्तेत प्रवेश घेतला. तिसरी ते बारावी पर्यंतचे माझे शिक्षण भंडारी हायस्कूलमध्ये झाले. या दहा वर्षात मला व माझ्या असंख्य मित्रांना भंडारी हायस्कूलने बरच काही दिल आहे. म्हणूनच आम्ही अभिमानाने भंडारी हायस्कूलचे विद्यार्थी असे सांगतो. भंडारी हायस्कूलने मला आयुष्यभर साथ देणारे असंख्य मित्र मैत्रीण दिल्या. हा मित्र मैत्रीणींचा ग्रुप एवढा प्रचंड आहे की त्याची यादी तयार करण्यासाठी एक स्वतंत्र ब्लाँग तयार करावा लागेल. मी किंवा माझे मित्र, मैत्रीण अडचणीत असू हा ग्रुप आमच्या मदतीला नेहमीच तयार असतो. भंडारी हायस्कूलने आम्हाला जीवनाचे महत्व शिकवणारे अनेक शिक्षक दिले. यामधील अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत तर काही शिक्षक आजही कार्यरत आहे. भंडारी हायस्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षिका कडक शिस्तीचे होते पण तेवढेच प्रेमळ होते. या शिक्षकांनी आम्हाला अभ्यास तर शिकवला पण त्याचबरोबरीने आमच्यातील कलागुणांनाही वाव दिला. भंडारी हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन, क्रिडा स्पर्धा, प्रजासत्ताकदिनी बोर्डींग ग्राऊंड, टोपीवाला हायस्कूल मैदानावर होणारे कार्यक्रम हा माझा व माझ्यासह असंख्य मि...

माझा वाचन प्रवास

वाचाल तर वाचाल असे एक सुवचन आहे. या सुवचनाने मला लहानपणापासून प्रेरित केले. पहिली ते पाचवी या कालावधीत मी जास्तकरुन गोष्टींची पुस्तके वाचली. सहावीपासून मी भंडारी हायस्कूलच्या ग्रंथालयात जाऊ लागलो. ग्रंथालयात मला वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके वाचायला मिळाली. सहावी ते दहावी या कालावधीत मी एकांकिका, पर्यावरण, विज्ञान या विषयावरची पुस्तके वाचली. अकरावी व बारावीत मी अनेक महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासली. त्याचबरोबर ऐतिहासिक विषयांवरील पुस्तकांचा अभ्यास केला. दोन वर्षात मी मृत्युंजय, राधेय, कौंतेय, राजा शिवछत्रपती, शुद्र पूर्वी कोण होते? आदि पुस्तके वाचली. या कालावधीत मी लोकमत या वृत्तपत्राचे सातत्याने वाचन करायचो. या वृत्तपत्रातील स्पर्धा परीक्षेसाठीची कात्रणे गोळा करुन मी त्याची एक वही बनवली होती. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसातच मी दै. रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करू लागलो. काँलेजच्या तीन वर्षांत माझे दैनंदिन वृत्तपत्रांचे वाचन वाढले. पण मी जिल्ह्यातील वृत्तपत्रे वाचन करत होतो. वृत्तपत्र वाचनाबरोबर अनेक मराठी कादंबऱ्यांचेही मी वाचन...

हि दोस्ती तुटायची नाय.......

निखिल गावकर आणि माझी मैत्री तिसरीपासूनची. भंडारी हायस्कुलमध्ये तिसरी ते दहावी या कालावधीत आम्ही एकत्र शिकलो. हायस्कूलमध्ये आम्ही माँनिटर, उपमाँनिटर जबाबदारी सांभाळयचो. त्यामुळे सात वर्षात आमची नावे कधीही फळ्यावर आली नाहीत.( वर्गात मस्ती करणाऱ्यांची नावे फळ्यावर लिहली जात). निखिल हा मच्छीमार कुटुंबातून आलेला आहे. परंतु निखिल शिक्षणाचे महत्व जाणून होता. म्हणून दहावीनंतर त्याने सायन्स करुन इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने अनेक ठिकाणी जाँब केले. अखेर त्याने घेतलेल्या परिश्रमाला फळ मिळाले आणि तो लघुपाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाला. निखिल हा सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आहे. त्यामुळे शासकीय नोकरीत रुजू होण्यापर्यंत त्याला अनेक संकटांनाचा सामना करावा लागला. पण सर्व संकटाचा सामना करुन निखिलने आपले ध्येय्य प्राप्त केले. मित्रांच्या मदतीला धावून जाणे हा निखिलचा स्थायीभाव आहे. आमच्या बँचने व्हाँट्सअपवर माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवला आहे. त्यामध्ये निखिलनेही पुढाकार घेत अनेक माजी विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये अँड केले. या ग्रुपच्या म...