मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*2 ऑक्टोंबर रोजी कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम*

मालवण वार्ताहर - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजया दशमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.      सकाळी 10:30 वाजता धम्म ध्वजारोहण, 10:45 वाजता धम्म वंदना, 11 वाजता जाहीर सभा व सेवानिवृत्त आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष रविकांत कदम असणार आहेत तर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इचलकरंजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.       प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, प्राध्यापक डॉ. नंदू हेदुळकर, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, महिला सरचिटणीस अपूर्वा पवार, माजी जिल्हाध्यक्ष एम.आर. डांगोमोडेकर, जेष्ठ...

कट्टा येथे सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रम

                   भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखा मालवण च्या वतीने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४८ वा स्मृतिदिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे संपन्न झाला.         सर्वप्रथम प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.दीप, धूप प्रज्वलित करण्यात आले.त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तालुका सरचिटणीस आद.प्रकाश पवार यांनी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुका प्रचार व पर्यटन सचिव आद.संग्राम कासले यांनी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तालुका शाखेला भेट दिली.         यावेळी जिल्हा संस्कार सचिव आद.विलास वळंजू,तालुका कोषाध्यक्ष आद.सूर्यकांत कदम,तालुका प्रचार व पर्यटन सचिव आद.संग्राम कासले, कुणकवळे गाव शाखा अध्यक्ष आद.संदीप कदम, तालुका संस्कार सचिव आद.योगेश वराडकर उपस्थित होते.

विनोद सातार्डेकर व आनंदी घोगळे यांना लायन्स क्लब मालवणतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मालवण ( वार्ताहर ) लायन्स क्लब मालवण तर्फे मसुरे प्राथमिक शाळा नं. १ चे शिक्षक श्री. विनोद सातार्डेकर यांना तसेच मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. आनंदी घोगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण लायन्स क्लबचा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित लायन्स क्लबचे झोन चेअरमन अमेय पै व ज्येष्ठ लायन्स सदस्य डॉ. शशिकांत झाट्ये यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. शिक्षक श्री. सातार्डेकर व सौ. घोगळे यांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  यावेळी झोन चेअरमन अमेय पै यांचे लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण यांनी भेटवस्तू देऊन स्वागत केले. मान्यवरांचा परिचय अंजली आचरेकर यांनी करून दिला. लायन्स क्लब मध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल रुजारिओ पिंटो व सहदेव बापार्डेकर यांना पिन व सन्मानपत्र देऊन अमेय पै यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच स्व:खर्चाने उत्तम सेवाकार्य करणाऱ्या अरविंद ओटवणेकर, उमेश शिरोडकर, विराज आच...

महान गांगेश्वर मंदिर नजीकचे वडाचे झाड कोसळले

मालवण वार्ताहर - गुरुवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास महान येतील गांगेश्वर मंदिर नदीचे मोठे वडाचे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील संदीप शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेले झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक जाण्यासाठीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर बांधकाम विभागाचे गावित यांनी घटनास्थळी पोहचून जेसीबीच्या सह्यायाने उर्वरित झाड रस्त्याच्या बाजूला केले. महान गावामध्ये अजूनही रस्त्याने वडाची व इतर झाडे धोकादायक बनली आहेत.तसेच प्राथमिक शाळा महान याला लागून असलेले वडाचे झाड धोकादायक स्थितीत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग कडून स्वागत

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजू झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मा. तृप्ती घोडमिसे यांचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने स्वागत करण्यात आले.       यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर सरचिटणीस संजय पेंडूरकर, माजी अध्यक्ष विश्वनाथ कदम संघटक ॲड. एस. के.चेंदवणकर समाजभूषण संदीप कदम,कीशोर कदम उपाध्यक्ष दिलिप कदम,सुभाष जाधव, महेंद्र कदम,,गुणाजी जाधव ,अभिजित जाधव, किशोर यादव, सर्वांनी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.        जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, शासकीय योजनांचा योग्य लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे, तसेच प्रशासन पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवण्याचे काम करु यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन केले.