सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजू झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मा. तृप्ती घोडमिसे यांचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर सरचिटणीस संजय पेंडूरकर, माजी अध्यक्ष विश्वनाथ कदम संघटक ॲड. एस. के.चेंदवणकर समाजभूषण संदीप कदम,कीशोर कदम उपाध्यक्ष दिलिप कदम,सुभाष जाधव, महेंद्र कदम,,गुणाजी जाधव ,अभिजित जाधव, किशोर यादव, सर्वांनी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, शासकीय योजनांचा योग्य लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे, तसेच प्रशासन पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवण्याचे काम करु यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा