माझा 16 एप्रिल रोजी कोळंब येथे एक्टिवा दुचाकीसह अपघात झाला होता. या अपघातात एक्टिवाचे पॅनल खरचटले होते. तसेच उजव्या साईडच्या आरशाचे नुकसान झाले होते. एक्टिवाचा इन्शुरन्स असल्यामुळे मी efco टोकियोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला एक्टिवा गाडी. होंडाच्या शोरूम सर्विसिंग सेंटर येथे नेण्यास सांगितली. मालवण होंडाचे शोरूम सर्विस सेंटर येथे दुरुस्तीची सोय नसल्याने कणकवली येथील लक्ष्मीनारायण होंडा येथे एक्टिवा दुचाकी नेण्यास सांगण्यात आले. 20 एप्रिल रोजी मी एक्टिवा दुचाकी कणकवली येथील लक्ष्मीनारायण होंडा येथे दुरुस्तीसाठी दिली. मी दहा दिवसांनी फोन केला असता दुचाकीचे पॅनल रंगवून आल्याची माहिती मला देण्यात आली. सदरची दुचाकी चार दिवसात मिळेल अशी माहिती देण्यात आली. मी चार दिवसानंतर फोन केला असता पार्ट पुन्हा मागवून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मी पुन्हा चार दिवसांनी फोन केला असता आणखीन चार दिवस लागणार असल्याचे शोरूम कडून सांगण्यात आले. मी 12 मे व ते 13 मे या दिवशी फोन केला असता 14 मे रोजी संपूर्ण दुचाकी तयार करून ठेवण्यात येईल असे...