भारतीय बौद्ध महासभा वडाचापाट, सिद्धार्थ मंडळ वडाचापाट, वडाचापाट बौद्ध विकास मंडळ, मुंबई, रमाई महिला मंडळ वडाचापाट यांच्या विद्यमाने वडाचापाट समाजमंदिर येथे ४ व ५ मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
४ मे रोजी सकाळी ९ वाजता निबंध स्पर्धा, सकाळी ११.३० वाजता वक्तृत्व स्पर्धा, दुपारी २.३० ते ६.३० वाजता फनी गेम्स, ५ मे रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजता धम्मध्वजारोहण, सकाळी ९.३० ते ११.३० वाजता वंदना सुत्रपठण, दुपारी ३ ते ५.३० वाजता धम्म रॅली, सायंकाळी ७.३० ते ९ वाजता जाहिर सभा होणार आहे. या कार्यक्रमास वडाचापाट सरपंच सोनिया प्रभुदेसाई, वडाचापाट बौद्ध विकास मंडळ मुंबई अध्यक्ष अजय कासले, माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, रविकांत कदम, संजय पेंडूरकर, नचिकेत पवार, अंकुश मुणगेकर, दत्ताराम मसदेकर, सतिश कासले, भानुदय कासले, सचिन कासले, सुरज कासले, पुरूषोत्तम कासले आदि उपस्थित राहणार आहेत. रात्री १०.३० वाजता श्री सातेरी प्रासादिक तरूण नाट्य कला क्रिडा मंडळ कवळी ता. कुडाळ यांचे 'येवा कोकण आपलाच आसा' हे नाटक सादर होणार आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा