मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी वाचलेला काव्यसंग्रह - अधांतर अंधारात (महेश केळूसकर)

गेले काही दिवस पुस्तकांचे वाचन केले नव्हते. परंतु काल संध्याकाळी कवी महेश केळुसकर यांचा अधांतर अंधारात हा काव्यसंग्रह वाचनात आला. त्यातील कविता वाचताना खरोखरच अंतर्मुख व्हायला झाले. सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या महेश केळुसकर यांच्या कविता प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. या काव्यसंग्रहातील काहीही न बोलता ही कविता देशातील सद्यस्थितीवर भाष्य करणारी आहे, तो माणूस तसा एकटा नाहीये. त्याच्यासारखे लाखो आहेत फाटके या देशात. काहीही न बोलता काय करायचं हे त्यांना माहित आहे सनातनपणे. या कवितेच्या शेवटच्या कडव्या मधून देशातील लोकांच्या स्थितीवर महेश केळुस्कर यांनी भाष्य केले आहे. बोलतच राहीन या कवितेच्या पहिल्या कडक्यातून जगण्याचे बळ मिळते, तुम्ही माझे हातपाय बांधा तोंडावर मुस्क्या बांधा तरीही मी बोलतच राहीन डोळ्यांनी... तुम्ही माझे डोळे फोडा तरी मी बोलतच राहीन भिंतीवर, जमिनीवर डोकं आपटत शिव्या देत राहीन तुम्हाला मनातल्या मनात मनापासून तळतळाट देत राहीन.  पुष्कळजन या कवितेतून माणसाच्या जीवनावर सोशलमीडियाचा किती प्रभाव पडला हे दिसून येते. आत्महत्या असो की निधन; लाईक करतात ल...

सौंदाळा मासळी खरेदी

आज मालवण समुद्रकिनारी लिलावाच्या ठिकाणी मासे खरेदी केले. समुद्रकिनारी सुरमई मासळी मोठया प्रमाणावर होती. पण बजेटनुसार सोंदाळा मासे खरेदी केले. https://youtu.be/Od4JNuE0u9w

समाज कल्याण वसतिगृह येथे शिक्षक दिन कार्यक्रमाला उपस्थिती

सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या मालवण येथील समाज कल्याण वसतिगृहाला शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक नागेश कदम यांची उपस्थिती होती. वसतिगृहाचे गृहपाल  के एस. इंदलकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी वसतिगृहातील विद्यार्थी कर्मचारी वृंद उपस्थित होते. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला होता.

1960 च्या बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचा साक्ष देणारा वडाचापाट गाव

रविवारी आम्ही आमचे मुळगाव वडाचापाट या गावाला भेट दिली. मालवण पासून 17 किलोमीटर अंतरावर वडाचापाट गाव आहे. साधारणत पाऊण तासाचा प्रवास आहे. 1960 साली वडाचापाट बौद्धवाडी येथे बौद्ध धम्मदीक्षेचा कार्यक्रम संपन्न झाला होता. या धम्मदीक्षा सोहळ्यात जिल्ह्यातील धम्म बांधव सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन जिल्ह्यातील धम्म बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आंबेडकरवादी चळवळ येथील जेष्ठ कार्यकर्ते मधुसूदन डांगमोडेकर यांनी याबाबतची माहिती आम्हाला उपलब्ध करून दिली होती. त्याचे वृत्तांकन दैनिक तरुण भारत मधून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे वडाचापाट गाव ऐतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते.https://youtu.be/Z5FjHM-Dml0

सौगंधराज बादेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 मित्र पत्रकार, हॉटेल व्यावसायिक सौगंधराज बांदेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आम्ही राणे कोल्ड्रिंक्स येथे कॉकटेल व फालुदाचा आस्वाद घेतला.

आजचा मेनू काकडी वडे

आज आमच्याकडे काकडीचे वडे हा मेनू तयार होत आहे. आई, पौर्णिमा, बाई यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेनू तयार होत आहे. थोड्या वेळाने काकडीचे वडे तयार होतील.

मालवण येथील रॉक गार्डन

मालवण येथील रॉक गार्डन पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळ आहे. मालवण बस स्थानक येथून दुचाकी किंवा फोर व्हीलरने 10 ते 15 मिनिटात रॉक गार्डन येथे पोहचता येते. रॉक गार्डन येथे पर्यटकांसाठी मुझिकल फाऊंटन उभारण्यात आले आहे. बच्चे कंपनीसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध आहे. पर्यटकांनी रॉक गार्डनला आवर्जून भेट द्यावी. https://youtu.be/JPPwDlydtIE

मालवण येथील चिवला बीच

मालवण येथील चिवला बीच हे पर्यटकांसाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. झालेले पर्यटक चिवला बीचला आवर्जून भेट देतात. शांत, सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा अशी चिवला बीचची ओळख आहे. तुम्हाला चिवला बीच येथे भेट द्यायची असल्यास मालवण बस स्थानक येथून दुचाकीने किंवा फोर व्हीलर ने तुम्ही चिवला बीच येथे येऊ शकता. दुचाकी किंवा फोर व्हीलरने साधारणतः दहा मिनिटात तुम्ही चिवला बीच येथे येऊ शकता. चिवला बीच येथे वॉटर स्पोर्टची सुविधा आहे. त्याचप्रमाणे येथे निवासाची देखील सोय आहे. सायंकाळच्या सत्रात येथील समुद्रकिनारी फेरफटका मारणे हे अतिशय आनंददायक असते. रात्रीच्या वेळी चिवला बीचा किनारा अतिशय रमणीय दिसतो. सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांनी चिवला बीचला अवश्य भेट द्यावी. https://youtu.be/HGn5PkBe35Y

प्राध्यापक नागेश कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

आमचे मित्र आणि प्राध्यापक नागेश कदम यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. प्राध्यापक नागेश कदम आणि माझी ओळख अकरावीत असताना निबंध लेखन स्पर्धेच्या निमित्ताने झाली होती.अकरावीत असताना मला निबंध लेखन करायचे होते. त्यावेळी कन्याशाळा येथे मी सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी प्राध्यापक नागेश कदम यांनी मला विस्तृतपणे निबंध लेखनाविषयी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्ष विविध निबंध स्पर्धांमध्ये प्राध्यापक नागेश कदम यांनी क्रमांक प्राप्त केले आहेत. यामध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचा देखील समावेश आहे. निबंध लेखन करत असताना तो कशा पद्धतीने करावे याचे सखोल ज्ञान प्राध्यापक नागेश कदम यांच्याकडे आहे. त्या पद्धतीने त्यांचे निबंध लेखन विस्तृत असते. एक उपक्रमशील शिक्षक म्हणूनही ते ओळखले जातात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ते सातत्याने मदत करत असतात. सातत्याने अभ्यास करावा लेखन करावे असे ते विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत असतात. माझी पत्नी पौर्णिमा आणि माझी ओळख प्राध्यापक...