गेले काही दिवस पुस्तकांचे वाचन केले नव्हते. परंतु काल संध्याकाळी कवी महेश केळुसकर यांचा अधांतर अंधारात हा काव्यसंग्रह वाचनात आला. त्यातील कविता वाचताना खरोखरच अंतर्मुख व्हायला झाले. सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या महेश केळुसकर यांच्या कविता प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.
या काव्यसंग्रहातील काहीही न बोलता ही कविता देशातील सद्यस्थितीवर भाष्य करणारी आहे, तो माणूस तसा एकटा नाहीये. त्याच्यासारखे लाखो आहेत फाटके या देशात. काहीही न बोलता काय करायचं हे त्यांना माहित आहे सनातनपणे. या कवितेच्या शेवटच्या कडव्या मधून देशातील लोकांच्या स्थितीवर महेश केळुस्कर यांनी भाष्य केले आहे.
बोलतच राहीन या कवितेच्या पहिल्या कडक्यातून जगण्याचे बळ मिळते, तुम्ही माझे हातपाय बांधा तोंडावर मुस्क्या बांधा तरीही मी बोलतच राहीन डोळ्यांनी... तुम्ही माझे डोळे फोडा तरी मी बोलतच राहीन भिंतीवर, जमिनीवर डोकं आपटत शिव्या देत राहीन तुम्हाला मनातल्या मनात मनापासून तळतळाट देत राहीन.
पुष्कळजन या कवितेतून माणसाच्या जीवनावर सोशलमीडियाचा किती प्रभाव पडला हे दिसून येते. आत्महत्या असो की निधन; लाईक करतात लोक काळीज उदास खोलले तरी स्मायली आणि जोक,शिंका जरी आली तरी इंस्टाग्राम वर फोटो पादला कोणी फुस्कन तरी फेसबुकवरती येतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा