मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रोशन मुकुंद आचरेकर यांना मोटर वाहन निरीक्षक पदी पदोन्नती

मालवण दि वार्ताहर - मालवणचे सुपुत्र तथा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रोशन मुकुंद आचरेकर यांना मोटर वाहन निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली असून त्यांची नियुक्ती अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे झाली आहे.  मालवण दांडी येथील रहिवाशी रोशन आचरेकर यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून मालवण दांडी येथील प्राथमिक शाळेत झाले व पुढील शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय सांगेली सिंधुदुर्ग येथे झाले आहे. तर इंजिनिअरिंगचे शिक्षण संगमेश्वर रत्नागिरी येथे झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून त्यांची नियुक्ती आरटीओ खात्यात सहायक मोटर वाहन निरीक्षक पदी 2017 मध्ये मुंबई बोरिवली येथे झाली होती. आता त्यांची पदोन्नती अकोला येथे झाली आहे एक अभ्यासू, कष्टाळू व सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेले अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या पदोन्नतीचे जिल्ह्यातील आणि मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

नाभिक समाजाच्यावतीने श्री भैरवी मंदिरात संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव

मालवण दि वार्ताहर नाभिक समाज बांधवांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणून मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांच्या धर्तीवर आपल्या व्यवसायात बदल करावा. युवा पिढीने बदलत्या वातावरणात आपल्यामध्येही विविध कला आत्मसात करून आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये प्रगती साधावी. नाभिक समाज बांधवांच्या सर्वच उपव मांमध्ये आपले योगदान राहणार असून श्री देवी भैरवी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना ( शिंदे गट )जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी केले. मालवण तालुका नाभिक समाजाच्यावतीने श्री भैरवी मंदिरात आज संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. नाभिक समाजाच्यावतीने समाज भूषण पुरस्कार मालवणचे पत्रकार मनोज चव्हाण यांना मान्यवरांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.  यावेळी व्यासापिठावर नाभिक समाज नेते विजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर,...

स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या विनायक मानवर याची इंडियन नेव्हीमध्ये निवड

मालवण ( वार्ताहर) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागाअंतर्गत एनसीसी ट्रेनिंग घेतलेला तसेच टी.वाय.बी.एसी. या वर्गात शिक्षण घेतलेला एनसीसी  सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली. विनायक मानवर हा अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये वाढलेला मुलगा असून काम करत त्याने कॉलेज शिक्षण केले. सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत हे विनायक मानवर याला त्याला गेली चार वर्ष मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी आर्मी विंग मधून शिक्षण घेऊन विनायक हा नेव्हीमध्ये भरती झाला. विनायक मानवर याच्या या यशाबद्दल  कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत, कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एनसीसी चे सर्व कॅडेट्स, सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे व इतर पदाधिकारी, मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, मालवण तहसीलदार...

मालवणी बझार मालवण व श्री गणेश नागरी पतसंस्था मालवण यांच्यावतीने एम.पी .पाटील यांचा सत्कार.

  मालवण वार्ताहर - श्री गणेश नगरी सहकारी पतसंस्था मालवण व मालवणी बाजार मालवणचे संस्थापक श्री एम. पी. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा सहकारी नागरी बँक असोसिएशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना एम. पी. पाटील म्हणाले की माझी झालेली निवड ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची पोच पावती आहे. यापुढे सुदधा सहकारात काम करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ऋण कधीही विसरणार नाही. यापुढे मालवणी बाजार व व गणेश नागरी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी कायम कटिबद्ध राहील. या कार्यक्रमास मालवणी बाजारचेे अध्यक्ष प्रमोद मोहिते, गणेश नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुप्रिया गावकर, उपाध्यक्ष व्ही. बी. पटकारे, संचालक संभाजी कोरे, सौ. जयश्री हडकर, कैलास साळुंखे, पी.जी. पाटील, मालवणी बाजारचे उपाध्यक्ष मारुती सोनवडेकर, संचालक श्रीकृष्ण तळवडेकर, रुपेश खोबरेकर तसेच श्री गणेश नागरी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धूरी यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

कोळंब हद्दीत परप्रांतीय कामगारांची आधार कार्ड तपासणी

 मालवण वार्ताहर -  वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी कोळंब हद्दीतील परप्रांतीय कामगारांच्या आधार कार्डची तपासणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशांत पवार, महादेव घागरे यांनी शुक्रवारी दुपारी कोळंब परिसरातील परप्रांतीय कामगारांकडे असणाऱ्या आधार कार्डची तपासणी केली.  ज्या आंबा बागायतदार व ट्रॉलर मालकांकडे परप्रांतीय कामगार आहेत. त्या मालकांनी परप्रांतीय कामगारांची आधार कार्ड घेऊन मालवण पोलिस स्टेशनशी  संपर्क साधावा असे आवाहन मालवण पोलिसांनी केले आहे.