मुख्य सामग्रीवर वगळा

नाभिक समाजाच्यावतीने श्री भैरवी मंदिरात संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव

मालवण दि वार्ताहर
नाभिक समाज बांधवांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणून मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांच्या धर्तीवर आपल्या व्यवसायात बदल करावा. युवा पिढीने बदलत्या वातावरणात आपल्यामध्येही विविध कला आत्मसात करून आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये प्रगती साधावी. नाभिक समाज बांधवांच्या सर्वच उपव मांमध्ये आपले योगदान राहणार असून श्री देवी भैरवी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना ( शिंदे गट )जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी केले.

मालवण तालुका नाभिक समाजाच्यावतीने श्री भैरवी मंदिरात आज संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. नाभिक समाजाच्यावतीने समाज भूषण पुरस्कार मालवणचे पत्रकार मनोज चव्हाण यांना मान्यवरांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी व्यासापिठावर नाभिक समाज नेते विजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर, माजी मुख्याध्यापक वामन खोत, अरूण तोडणकर, बाळू नाटेकर, किसन मांजरेकर, राजू बिडये, मंदार लुडबे, महेश सारंग, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, तालुकाध्यक्ष अॅड. भाऊ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, तालुकाध्यक्षा दिपा शिंदे, उपाध्यक्ष संदीप चव्हाण, युवा अध्यक्ष संदीप लाड, कार्याध्यक्ष शुभम लाड, सचिव कांता चव्हाण तसेच इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते


प्रारंभी तालुकाध्यक्ष अॅङ भाऊ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले 

यावेळी सुदेश आचरेकर यांनी  नाभिक समाजातील युवा पिढीच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्यासाठी आपण सदैव तयार असतो. या समाजाचे उपक्रम कौतुकास्पद  व समाजहित लक्षात ठेवून केलेले असतात असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांता चव्हाण यांनी केले.

यावेळी अरविंद चव्हाण स्मरणार्थ चव्हाण कुटुंबिय पुरस्कृत ज्येष्ठ नाभिक बांधव व पुरस्कार २०२५ विठ्ठल विष्णू आचरेकर (आचरा), प्रकाश जयवंत चव्हाण (मालवण) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श सलून व्यावसायिक पुरस्कार विजय शिवा चव्हाण (मालवण). आदर्श नाभिक संघटक पुरस्कार जगदीश - परशुराम चव्हाण (मसुरे), आदर्श नाभिक संघटन कौशल्य पुरस्कार गणेश बाळू चव्हाण (श्रावण). आदर्श समाज सेवक पुरस्कार संदीप सुभाष चव्हाण (तळगाव), व आदर्श नाभिक महिला पुरस्कार प्रज्ञा भाऊ चव्हाण (गोळवण), गितांजली गणेश लाड (कोळंब). यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.