आमच्या सहजीवनाची दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही दोघांनी मुंबई चैत्यभूमी येथे जाऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. दादर रेल्वे स्टेशन येथून टॅक्सी किंवा रिक्षाने दादर चैत्यभूमी येथे जाता येते. तुम्ही दादर रेल्वे स्टेशन येथून चालतही चैत्यभूमी येथे जाऊ शकता. दादर चैत्यभूमी येथे सुरुवातीलाच विविध पुस्तकांचे स्टॉल आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे महामानवांच्या फोटोचे स्टॉल देखील दिसतात. दादर चैत्यभूमी चा परिसर अतिशय सुंदर आहे.