मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शनिवार.........

 शनिवार......... शनिवार शाळेत असल्यापासूनच माझा आवडता वार. दूरदर्शनवर शक्तीमान सुरु झाल्यापासून शनिवार माझा आवडता वार झाला. शनिवारी शाळा सुटल्यावर 11.30 वाजता शक्तीमान पाहण्यासाठी मी धावत घरी जात असे. शक्तीमान पाहून झाल्यावर संध्याकाळी क्रिकेट खेळणे त्यानंतर अभ्यास असा दिनक्रम झाला होता. पुढे शक्तीमान सिरीयल बंद झाल्यावर शनिवारी शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळणे हा माझा आणि माझ्या मित्रांचा आवडता छंद बनला. भंडारी हायस्कूलच्या ग्राऊंडवर शनिवारी सकाळी 7.30 ला शाळा भरण्याअगोदर आम्ही ग्राऊंडवर पोहचायचो. तेवढ्यात वेळेत आमचा क्रिकेटचा डाव व्हायचा. त्यानंतर शनिवारच्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर मनसोक्त खेळायचो. अकरावी बारावीत अभ्यासामुळे शनिवारचा आनंद लुटता आला नाही. त्यानंतर पत्रकारितेमुळे फारसा शनिवारीचा वेळ मिळत नव्हता. बीएडच्या बीझी शेड्यूलमुळे शनिवार अनुभवता आला नाही. 2012 मध्ये सावंतवाडीला हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करताना मला तीन वर्षे पगार नव्हता. त्यामुळे अर्थाजनासाठी मालवण येथे शनिवारी क्लास सुरु करणे भाग पडले. त्यामुळे शनिवारचा वेळ मुलांसोबत जायचा. 2016 मध्ये मी सामाजिक ...

ऐसा है हमारा टायटस.........

ऐसा है हमारा टायटस......... आज सकाळी एका बातमीच्या निमित्ताने दांडी समुद्रावर गेलो होतो. वाटेत येताना टायटस भेटला. त्याने दूरूनच मला थांबण्याचा इशारा केला. मी गाडी थांबवली. टायटस म्हणाला, मला मुलगी झाली. मी त्याचे अभिनंदन केले. पुढे जाऊन तो म्हणाला 'तु काय आपल्या दहावीच्या ग्रुपवर टाक'. टायटसला काय म्हणायच ते माझ्या लक्षात आले. मी घरी गेल्यावर टायटस व रुचिरा यांना मुलगी झाल्याची पोस्ट ग्रुपवर टाकली. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडेल की कैसा है ये टायटस! टायटस आणि माझी मैत्री बालवाडी पासूनची आहे. बालवाडीत मी आणि टायटस वाघ बाईंकडे एकत्र असायचो. त्यानंतर टायटस रोझरी इथल्या शाळेत गेला. तरीही तो अधूनमधून भेटायचा. सातवीत टायटस भंडारी हायस्कूलमध्ये आमच्या सोबतीला आला. टायटस हा एक अजब रसायन आहे. कोणत्याही परिस्थितीत विनोद करुन वातावरणात हसत खेळत ठेवणे हा त्याचा स्थायिभाव. परंतु कधीकधी त्याचे विनोद भलतेच गंभीर वातावरण निर्माण करायचे. टायटसचा इंग्रजी व्याकरणाचा विशेष अभ्यास आहे. त्याचे क्रिकेटवर विशेष प्रेम आहे. तसेच बास्केटबॉल, व्हाँलीबाँल हे खेळही विशेष आवडतात.आम्ही दहा...

भांडीविक्रेत्याला मदतीचा हात.......

भांडीविक्रेत्याला मदतीचा हात....... लाँकडाऊन कालावधी आम्हा पत्रकारांकडे मदतीच्या आवाहनासाठी बातम्या येत होत्या. आमचे सहकारी प्रतिनिधी मनोज चव्हाण हे बेळगाव येथील भांडी विक्रेते मंजुनाथ शिवाजी गोंधळी या भांडी विक्रेत्याला मदत हवी आहे अशा आशयाची बातमी करणार होते. आम्ही पत्रकार अशा प्रकारच्या बातम्यांद्वारे गरजू व्यक्तीला मदतीचे आवाहन करीत असतो. पण आमच्या दै. तरुण भारत मालवण कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी यावेळी भांडीविक्रेते गोंधळी यांना स्वतः हून मदत करायची ठरवली. त्यानुसार आमचे सहकारी बंटी केनवडेकर, मनोज चव्हाण, अक्षय मयेकर, उमेश शिरोडकर आणि मी अशा सर्वांनी मिळून गोंधळी आणि त्यांच्या कुटुंबियांना महिन्याभरासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू देण्याचे ठरवले. गोंधळी यांना आँफिसमध्ये बोलावून सर्व वस्तू देण्यात आल्या. यानंतर मंजुनाथ गोंधळी यांना मदत हवी असल्याचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले. आणि त्यानंतर त्यांना काही व्यक्तींनी मदतही केली. लाँकडाऊन कालावधीत सर्वांची आर्थिक स्थिती बेताची आहे. गोंधळी हे एमएटीवरुन भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. पण लाँकडाऊन कालावधीत त्यांचा व्यवसाय बंद असल्याने त्...

क्वारटाईनमध्येही शाळेविषयी कृतज्ञता.......

क्वारटाईनमध्येही शाळेविषयी कृतज्ञता....... कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले. चाकरमान्यांनी कोकणात यावे की न यावे याबाबत स्थानिकांमध्ये अनेक मतमतांतरे होती. सरतेशेवटी चाकरमानी कोकणात दाखल झाले. या चाकरमान्यांना स्थानिक प्राथमिक शाळा, हायस्कूल यामध्ये सध्या क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. परंतु क्वारटाईन कालावधीत या चाकरमान्यांनी आदर्शवत उपक्रम राबवले आहेत. एप्रिल, मे महिना शाळा बंद असण्याचा कालावधी. त्यामुळे नेहमीप्रमाणे शाळेत मुलांची रेलचेल नाही. परंतु चाकरमान्यांनानी क्वारंटाईन कालावधीत शाळांची साफसफाई करण्याचे महत्वपूर्ण काम केले. मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर, वायंगणी हायस्कूल या शाळेत क्वारंटाईन असणाऱ्या चाकरमानी व माजी विद्यार्थ्यांनी शाळांची स्वच्छता केली. शाळेच्या सभोवतालचा परिसर पूर्ण स्वच्छ केला. शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांची देखभालही चाकरमान्यांनी केली आहे. झाडांना अळी करुन त्यांना पाणी देत वृक्षसंवर्धनाचा संदेशही दिला आहे. मसुरे देऊळवाडा भरतगड येथील क्वारटाईन असलेल्या तरुणांनी शाळेच्या साफसफाईबरोबर शाळेची रंगरंगोटी देखी...

आठवणीतला कबीर......

आठवणीतला कबीर......  साधारण चार वर्षापूर्वी बार्टीच्या समतादूत प्रकल्पाची कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत एक तरुण डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत सादर होता. मेरे संविधानके शिल्पकार तेरा जलवा यहाँ पर अभी है असे त्या गीताचे बोल होते. त्या गीताला समतादूतांकडून वन्स मोआर मिळत होता. मी माझा मित्र दत्ता गायकवाडला विचारल, दत्ता हा परिवर्तनवादी चळवळीतील आहे का? दत्ता म्हणाला नाही रे कबीर अत्तार आहे त्याचे नाव. तो मुस्लिम आहे पण परिवर्तनवादी चळवळीतली गाणी म्हणतो. दत्ताने कबीरची जी ओळख करुन दिली त्या ओळखीतूनच कबीर काय आहे हे समजला आणि कायम आठवणींच्या कप्यात राहिला. त्यानंतर माझी आणि कबीरची ओळख झाली. कबीरच्या कविता माझ्या समतानायक या विशेषंकातून प्रसिद्ध केल्या होत्या. कबीर सध्या समतादूत प्रकल्पात नाही. तो आपले दुकान सांभाळून राज्यात प्रवचन, किर्तनसेवा करतो. छत्रपती शिवाजी महारांजावरील त्याची प्रवचने अभ्यासपूर्ण असतात. शिवा काशिदवरील त्याचे किर्तन मला फार आवडते. राज्यात कबीरने बऱ्याच ठिकाणी काही किर्तन केली आहेत. त्याची अनेक किर्तने युट्यूबवर उपलब्ध आहेत. रमजानच्या नि...

शिरकुर्मा आणि बिर्याणी.......

शिरकुर्मा आणि बिर्याणी.......  काल रमजान ईद सण साजरा झाला. दुपारी 2.30 वाजता आमच्या शेजारच्या खराडेवाली चाचींकडून बिर्याणी आणि शिरखुर्माचा डबा आमच्याकडे आला. दरवर्षी न चूकता त्यांच्या कडून आम्हाला डबा येतो. मला वाटत रमजानच्या निमित्ताने त्यांच्याशी आमचे माणुसकीचे नाते अधिक दृढ होत आहे. आम्ही तीस वर्षे मालवण शहरात राहत आहोत. या तीन वर्षांतील अनेक वर्षे आम्ही मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजबांधवकडे भाड्याने राहिलो. माझे आणि बहिणीचे बालपण या समाजबांधवांमध्ये गेले. रमझानच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही वायरी मुस्लिम मोहल्ला येथे चाचींकडे भाड्याने राहायला होतो. त्यावेळी बाजूच्या बौद्धवाडीत माझा मित्र परिवार होता. तेवढाच मित्रपरिवार मुस्लिम मोहल्यात होता. मोहसिन, मतीन, तौसिफ या सारखे अनेक मित्र मला मुस्लीम मोहल्यातच भेटले. मोहसिन, मतीनने गँरेजच्या माध्यमातून व्यवसाय करतात त्यांची नेहमी भेट होतच असते. तौसिफ, युसुफ हे दुबईत असतात पण मालवणला आल्यावर ते आवर्जून भेट घेतात. मला वाटत या सर्वांशीच माझे माणुसकीचे नाते आहे. मला वाटत प्रत्येक धर्म हा शांती, समता, माणुसकीचा संदेश देतो. ...

कोरोना कालावधीतील आठवडा बाजार..

कोरोना कालावधीतील आठवडा बाजार............                         कोरोना कालावधीत बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. त्यापैकी एक म्हणजे आठवडा बाजार करणे. मालवणचा आठवडा बाजार दर सोमवारी भरतो. मालवणचा आठवडा बाजार (कोरोना आजारापूर्वी) हा मालवण बाजारपेठेपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत भरलेला असायचा. त्यामुळे एवढा बाजार फिरणे, त्यातील आवश्यक त्या गोष्टी खरेदी करणे त्यानंतर बाजार पिशव्यांमध्ये भरुन बाजारातून बाहेर येणे हे कठीण काम असायचे. परंतु कोरोना कालावधीत बाजार करणे खूप सोपे वाटू लागले आहे. कारण आता किनाऱ्यावर फारसा बाजार भरत नाही. जो बाजार भरतो तो बाजारपेठेत. सध्या बाजारपेठेची सुरुवात स्थानिक भाजी विक्रेत्यांपासुन होते. बाजारपेठेतील सर्वच भाजी व फळविक्रेते चेहऱ्यावर मास्क लावून व सोशल डिस्टसिंग पाळत वस्तंची विक्री करताना दिसतात. ग्राहकही सोशल डिस्टसिंगचे भान पाळून वस्तूंची खरेदी करताना दिसत होते.लाल भाजी, मुळा, चवळी पाला, भोपळा, वाली, भेंडी तसेच अन्य भाज्या विक्रीस होत्या. सध्या बाजारात सर्वात महाग वस्तू भेटते ती लिंबू आणि कोथिंबीर. बा...

कोरोना अन् सामाजिक बांधिलकी..........

                                                कोरोना अन् सामाजिक बांधिलकी..........     कोरोना कालावधीत लोकांवर अनेक बंधने आली. गेल्या तीन महिन्यात प्रत्येकाने आपले दैनंदिन जीवन पाहिले तर त्याचा प्रत्यय येईल. कोरोना कालावधीत सण, समारंभ, उत्सव या साऱ्यांवरच बंधने आली. परंतु या कालावधीतही काही व्यक्तींनी शासनाचे नियम पाळून सामाजिक बांधिलकी जोपासत सण, समारंभ, उत्सव साजरे केले. मालवण येथील कर सल्लागार महादेव पाटकर व कुडाळ येथील योगेश्री देसाई यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विवाहबद्ध झाले. उभयतांनी संविता आश्रमासाठी 700 लोकांच्या जेवणासाठी असलेले साहित्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सूपूर्द केले. पाटकर दाम्पत्याचा हा उपक्रम अनेकांसाठी आदर्शवत आहे.  हाती शस्त्र न घेता बुद्ध राज्य करी जगावर कारण प्रचार प्रभावशाली.  या विधानाप्रमाणे दांडी येथील समित कोळगे व प्रज्ञा चोपडेकर उभायता कोरोनाविषयक जाणीव जागृती करुन विवाहबद्ध झाले. उभयता सोशल डिस्टसिंगने विवाह...

कोरोना.. कठीण...पण शांततेचा काळ......

                                                                                                                       कोरोना.. कठीण...पण शांततेचा काळ......      गेले तीन महिने आपण सर्वजण कठीण काळात जगत आहोत. पण हा काळ कठीण असला तरी अनेकांसाठी तो शांततेचा आहे. या तीन महिन्यांत देशातील अनेक गोष्टी बंद होत्या. त्याचा परिणाम आपल्याला पुढील काही वर्षामध्ये दिसणार आहे. पण आपण या तीन महिन्यातील शांततेच्या काळात काय केले याचेही अवलोकन करणे महत्त्वाचे आहे. शांततेच्या काळात आपण जे कार्य केलेले आहे ते नजीकच्या काळात आपल्याला उपयोगी पडणार आहे.        मालवण येथील संग्राहक उदय रोगे यांनी कोरोना साथ रोगाच्या कालावधीत माफक किमतीतील मास्कची निर्मिती केली. त्याच्या या उपक्रम...

Lockdown ani Baban

लाँकडाऊन आणि बबन.........   आमच्या शेजारी दोन वर्षांपूर्वी बबन आणि त्याचे कुटुंबीय कर्नाटक विजापूर येथून रहायला आले होते. बबन त्याची पत्नी दोन लहान मुले यांच्यासह भाड्याने राहत होता. बबनचे खरे नाव राम पवार , परंतु तो बबन चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसत असल्याने आम्ही त्याला बबन म्हणत असू. मालवण किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगमध्ये तो मदतनीस म्हणून काम करत होता. परंतु कोरोना आणि लाँकडाऊनमुळे दोन महिन्यापूर्वी त्याच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या दोन महिन्यात बबन या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलु माझ्यासमोर उलघडले. बबनने त्याच्या गावात काही काळ एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते. तो शिक्षणाचे महत्त्व जाणून होता. म्हणूनच त्याने आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते.परंतु दोन महिने बबनकडे रोजगार नसल्याने त्याची व कुटुंबियांची आर्थिक स्थिती बिघडली होती. अशा परिस्थितीत त्याला काय करावे हे सुचत नव्हते. काम मिळावे यासाठी त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले परंतु लाँकडाऊनमुळे त्याला काम मिळेना. अखेर बबनला त्याच्या मूळ गावी जाण्यावाचून पर्याय नव्हता. परंतु गावी जावे की न ...

Rock Garden Malvan

  राँक गार्डन परिसरातील निरव शांतता.....   माझा मित्र भूष या स्पाँटवरून नेहमी फोटो काढतो. भूष अँंगलचे असंख्य फोटो त्याने येथून काढले आहेत. मी बोलतोय मालवणच्या राँक गार्डन विषयी. मालवणवासीय आणि असंख्य पर्यटक राँक गार्डनला आवर्जून भेट देतात. राँक गार्डन हे मालवणवासीयांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण आहे.राँक गार्डन मध्ये येणारा प्रत्येक जण टेहळणी बुरुजावरुन दिसतो. या टेळहणी बुरुजावरुन (आम्ही पत्रकारांनी बनवलेला शब्द)  पण कोरोनाच्या संकटामुळे गेल्या ६० दिवसात राँक गार्डन आणि बाजूचा समुद्र किनारा पहायला कोणी फिरकलेल नाही.अथांग पसरलेला सागर आणि खडकाळ भागात त्याच्या धडकणार्या लाटा पाहण्यासाठी असंख्य जण येत असतात. पण गेल्या दोन महिन्यात इथला परिसर निर्मनुष्य भासत आहे. राँक गार्डनच्या बाजूला छोटी छोटी दुकानांमध्ये पर्यटक स्थानिक, नागरिक यांची नेहमी गर्दी असायची पण कोरोनामुळे दुकानेही सध्या बंद आहेत. सध्या फक्त पक्षांचा किलबिलाट आणि सागराची गाजही ऐकू येते. पण सारा परिसर कुणाची तरी वाट पाहतोय. कारण अशी शांतता या परिसराला पसंत नाही. या परिसराला हव आहे लहान मुलांचे बागडणे, सुट्ट...

My Friend

भाल्या.......       भाल्या हा माझा बीएडचा मित्र. मुळात भाल्या आणि माझी मैत्री होईल असे मला कधीही वाटले नव्हते. पण बीएडला पप्पूची ओळख झाली आणि त्यानंतर भाल्या मला भेटला. भाल्याचे नाव भालचंद्र ठाकूर पण बहुतांश मित्र त्याला भाल्याच म्हणतात. भाल्या हे नामकरण पप्पूनेच केले आहे.( असे पप्पू दरवेळी आम्हाला सांगतो.) बीएड होऊन आठ वर्षांचा कालावधी लोटला असेल पण तरीही बीएड लक्षात राहतो ते भाल्या, पप्पू आणि काही मित्र-मैत्रिणीमुळे. बीएड नंतर भाल्या माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झाला. बीएडनंतर नोकरीसाठी करावी लागणारी वणवण, मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे तीन वर्षे पगाराअभावी आलेले नैराश्यक्षया कालावधीत माझे कुटुंब, माझे मित्र-मैत्रिणी त्याचबरोबर भाल्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. भाल्यानेच मला खडबडून जागे केले आणि मळेवाड येथील शिक्षकाची नोकरी सोडायला लावली. आज त्याचा तो निर्णय मला सार्थ वाटतोय. बार्टीच्या इंटरव्ह्यूच्यावेळी भाल्या दिवसभर माझ्यासोबत पुण्याला थांबून होता हे मी कधीही विसरणार नाही.     भाल्या नेहमी म्हणतो शिक्षकापेक्षा तु पत्रकारीतेच्या फिल्डमध्ये...