मुख्य सामग्रीवर वगळा

Lockdown ani Baban


लाँकडाऊन आणि बबन......... 
आमच्या शेजारी दोन वर्षांपूर्वी बबन आणि त्याचे कुटुंबीय कर्नाटक विजापूर येथून रहायला आले होते. बबन त्याची पत्नी दोन लहान मुले यांच्यासह भाड्याने राहत होता. बबनचे खरे नाव राम पवार , परंतु तो बबन चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसत असल्याने आम्ही त्याला बबन म्हणत असू. मालवण किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगमध्ये तो मदतनीस म्हणून काम करत होता. परंतु कोरोना आणि लाँकडाऊनमुळे दोन महिन्यापूर्वी त्याच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या दोन महिन्यात बबन या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलु माझ्यासमोर उलघडले. बबनने त्याच्या गावात काही काळ एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते. तो शिक्षणाचे महत्त्व जाणून होता. म्हणूनच त्याने आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते.परंतु दोन महिने बबनकडे रोजगार नसल्याने त्याची व कुटुंबियांची आर्थिक स्थिती बिघडली होती. अशा परिस्थितीत त्याला काय करावे हे सुचत नव्हते. काम मिळावे यासाठी त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले परंतु लाँकडाऊनमुळे त्याला काम मिळेना. अखेर बबनला त्याच्या मूळ गावी जाण्यावाचून पर्याय नव्हता. परंतु गावी जावे की न जावे अशा द्विधा मनस्थितीत तो सापडला होता. मुलांच्या शाळेच्या भवितव्याबाबत त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तो वेळोवेळी आमच्या कुटुंबाशी, शेजाऱ्यांशी तो याबाबत चर्चा करायचा. पण चर्चेतून मार्ग निघत नव्हता. आणखी काळ लाँकडाऊन राहिले तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्याच्यासमोर होतो. अखेर त्याने विजापूरला जाण्याचा निर्णय घेतला. आपले सामान दुसऱ्या एका खोलीत ठेवून पुन्हा मालवणमध्ये येण्याच्या विचाराने तो विजापूरला जाण्यासाठी सज्ज झाला. चौघांच्या आरोग्य तपासणीनंतर तो श्रमिक रेल्वेने विजापूरला रवाना झाला. सध्या बबन आणि त्याचे कुटुंबीय विजापूर येथे क्वारटाईनमध्ये आहेत. बबन मालवणमध्ये परत येईल अशी आशा आहे. पण लाँकडाऊनमध्ये असे अनेक बबन आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत मूळ घरी परतले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रत्येक बबनच्या अशाच व्यथा असतील. कोरोना आणि लाँकडाऊने या साऱ्यांची एक प्रकारे परीक्षा पाहिली. आपला भारत देश श्रमिकांचा आणि कष्टकऱ्यांचा आहे. कष्टकऱ्यांच्यां श्रमावरच हा भारत उभा आहे.परंतु कोरोना आणि लाँकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या देशातील असंख्य कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. रोजंदारीवर काम करणारा कामगार, मजूर या संकटांशी एकटा लढतोय. तो या संकटावर मात करेल. परंतु त्याला मदतीचा आधार देण्याची गरज आहे. शासनाने अशा रोजंदारीवरील कामगारांसाठी सुनियोजित कार्यक्रम बनविणे गरजेचे आहे. तरच त्यांच्या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा होईल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.