काही दिवसापूर्वी ओरोस येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या कमलेश सोनावणे या मित्राची फेसबुकवर एक पोस्ट आली. घरपण द्या माझ्या घरा या अल्बममध्ये कमलेशने अभिनय केल्याची ती पोस्ट होती. त्या पोस्टखालीच कमलेशने लवकरच सरप्राईज असे लिहिले होते. त्याच्या दोन दिवसानंतर कमलेशने मला गणरायाची स्वारी या अल्बमची युट्यबची लिंक शेअर केली. त्या व्हिडीओत कमलेश अफलातून नृत्य सादर करताना दिसला. क्षणभर मला प्रश्न पडला की कमलेश नक्की काय करतो? कमलेशचे अभिनंदन करण्यासाठी मी कमलेशला फोन केला. त्यावेळी कमलेशसोबत भरभरून बोललो. फोनवर बोलताना कमलेशच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलु उलघडत गेले. कमलेशच्या व्यक्तीमत्त्वाचे पैलु सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच आजचा ब्लॉग लिहिण्याचा प्रपंच. कमलेश व निलेश या दोघेही भावांचे शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील त्यावेळी मालवण पोलीस ठाण्याला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. बालवाडी ते सातवीपर्यंत कमलेश व निलेश भंडारी हायस्कूला होते. पाचवीत असताना आम्ही जिस देश मै गंगा रहता है या गाण्यावर नृत्य केले होते. त्यामध्ये कमलेश व निलेशने सुंदर नृत्...