मुख्य सामग्रीवर वगळा

अर्थशास्त्राची आवड निर्माण करणारे बांदेकर सर!


अकरावी बारावी ही दोन वर्षे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानतो. कारण अकरावीत माल अनेकांनी सायन्स घे असे सांगूनही मी स्वत:च्या निर्णयावर ठाम राहून आर्टस निवडले होते. दोन वर्षे मी भंडारी हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे तत्कालीन मुख्याध्यापक प्रा. वाय. आर. राजूरकर, प्रा. ए. व्ही. देसाई, सौ. समिता मुणगेकर मॅडम, परूळेकर सर, सौ. प्रभु मॅडम या मार्गदर्शक शिक्षक व प्राध्यापकांच्या सानिध्यात घालविली. या प्राध्यपकांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. रूपेश बांदेकर सर. बांदेकर सर आम्हाला अकरावी बारावीला अर्थशास्त्र शिकवायचे. सरांमुळेच मला अर्थशास्त्राची आवड मला निर्माण झाली. बहुतांश अर्थशास्त्रज्ञांची नावे सरांच्या तोंडपाठ आहेत. अर्थशास्त्र अनेक सिद्धांत बांदेकर सरांनी सोप्या भाषेत करून सांगतिले. हे मीच नाही तर माझ्या बॅचचे अनेकजण सांगतील. म्हणूनच काय घटत्या उपयोतितेचा सिद्धांत आणि त्यावर सरांनी दिलेले लाडूचे उदाहरण आजही स्मरणात आहे आणि दिर्घकाळ स्मरणात राहिल. सर छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला अर्थशास्त्र शिकवयाचे उदा. आम्हाला बारावीचा ट्रीपला जायचे होते. पण एकदम पैशाची साये होणे कठीण होते. म्हणून बांदेकर सरांनी अकरावीतच आम्हाला दर महिन्याला ठराविक पैसे जमा करण्यास सांगितले होते. सरांचा वाचनाचा व्यासंगही मोठा आहे. सर विविध पुस्तकांचे वाचन सातत्याने करत असतात. आम्ही अकरावी, बारावीत असताना सर अतिशय कडक शिस्तीने वागायचे. भंडारी हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन म्हणजे आमच्यासाठी जीव की प्राण असायचे. त्यावेळी सर अभ्यासाकडेहि लक्ष द्या असेही आर्वजून सांगायचे. सरांचा 45 मिनिटांचा लेक्चर दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांनी सजलेला असतो. त्यामुळे सरांच्या लेक्चर बसणे मला आणि माझ्या मित्रांना कधीच कंटाळवाणे वाटले नाहि. बारावी झाल्यावरही सर सातत्याने संपर्कात असतात. सर्व भेटले की विद्यार्थ्यांची आपुलकीने व आस्थेने चौकशी करतात. वर्षातून दोनदा सर आवर्जून फोन करतात. एक म्हणजे सैनिकांना राख्या पाठविण्याच्या कार्यक्रमाचे वृत्तसंकलन करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे वनभोजनाच्या निमित्ताने. पत्रकारीतमुळे वेळच गणित नेहमीच अँडजेस्ट होत नाहि. परंतु माझा दोन्ही कार्यक्रमांना जाण्याचा प्रयत्न असतो. सरांचे संघटन कौशल्य उत्तम आहे. सरांच्या एका हाकेवर भंडारी ज्युनियर कॉलेजची मुले एकत्र येतात हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. सर विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असतात. आज सरांचा वाढदिवस आहे. बांदेकर सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!  

                                                       संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.