मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*५ एप्रिल रोजी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा*

मालवण - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.    स्पर्धा गट पहिला -( सातवी ते बारावी), गट दुसरा - खुला गट अशा दोन गटात होणार आहे. गट पहिला (सातवी ते बारावी)- भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व अधिकार तर गट दुसरा (खुला गट )-  भारतीय संविधानाची ७५ वर्ष असे विषय देण्यात आले आहेत. पहिल्या गटासाठी वेळ -सात मिनिटे तर दुसऱ्या गटासाठी वेळ - आठ मिनिटे देण्यात आली आहे.    पहिले गटातील विजेत्यांना १००० रुपये, ७०० रूपये, ५०० रुपये, तसेच प्रशस्तीपत्रक, तर खुल्या गटातील विजेत्यांना १५०० रुपये, १००० रुपये, ७०० रुपये तसेच प्रशस्तीपत्रक व उत्तेजनार्थ क्रमांक प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात येणार आहे.  संपर्क लक्ष्मीकांत खोबरेकर -9422946212 संग्राम कासले 9420824874