*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी आरावंदेकर, हेमंत पाटकर प्रथम* मालवण वार्ताहर - समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या वतीने बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटात श्रावणी आरावंदेकर तर खुल्या गटात हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. स्पर्धेचा सविस्तर निकाल शालेय गट द्वितीय- दिक्षा वराडकर, तृतीय- सर्वेश मसुरकर, उत्तेजनार्थ - निधी सोनवडेकर, खुला गट द्वितीय सोनाली गोडे, तृतीय - अनुष्का कदम, उत्तेजनार्थ गुरुदास परब, विजेत्यांना रोख रक्कम तसेच प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बॅ. नाथ सेवांगणाचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खंडाळकर, परीक्षक संजय शिंदे, संग्राम कासले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.