मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पूरा नाम मनोज अरविंद चव्हाण

 'पूरा नाम मनोज अरविंद चव्हाण' बहुतेक वेळा फोनवर मनोज अशीच आपली ओळख सांगतो. मनोज अरविंद चव्हाण या नावात पत्रकारिता, मैत्री, आपुलकी, योग्य पद्धतीने काम न करणाऱ्या प्रशासनाविरुद्धचा रोष,  क्रिकेट आणि बरच काही सामावल आहे. 1997 पासून ते आजातागातय मालवणने मनोजमधले अनेक पैलु पाहिले आहेत. बातमीपर्यंत सर्वात अगोदर पोहचणे हि मनोजची खासियत आहे. त्यात जर क्राईमची बातमी असेल तर मनोज आणखी वेगाने बातमीपर्यंत पोहचतो. अपघात, खून, गळफास, अपहार या बातम्या मनोज ज्या पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. क्राईमच्या प्रत्येक बातमीत त्याने केलेले निरीक्षण दिसून येते. कुठलीही बातमी पोलीस स्टेशनला येऊन संपणार आहे, त्यामुळे क्राईमच्या बातमी मागे रहा असे तो नेहमी सांगतो. पत्रकाराने बातमी लिहणे हे सोपे असते पण ती बातमी विविध सोर्सच्या आधारे लवकरात लवकर मिळवणे हे कौशल्याचै काम आहे. मनोजने हे कौशल्य आत्मसात केले आहे. मनोजचा जनसंपर्क मोठा आहे. हाच जनसंपर्क त्याला बातमीपर्यंत घेऊन जातो. मालवण हे पर्यटन स्थळ असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येतात. मालवण समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक बुडाल्याच्या अनेक घटना घडत असतात. ...

ठळक काय?

 दिवसभरातून एक दोनदा तरी ठळक काय? हे वाक्य  आमच्या कानावर पडते. जिल्ह्यात आणि तालुक्यात काय घडत आहे? हे जाणून घेण्यासाठी आमचे मित्र आणि लोकमान्य शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी नितीन मांजरेकर नेहमीच उत्सुकत असतात. तरुण भारत या दैनिकावर नितीन मांजरेकर यांचे निस्सीम प्रेम आहे. कधीपासून वाचतय तरुण भारत म्हायत आसा तुका? असे ते आम्हाला आवर्जून सांगत असतात. दै. तरुण भारतमधल्या बातमी शिवाय ते कोणत्याही बातमीवर ते विश्वास ठेवत नाही. तरुण भारतला इली ना बातमी, मग कन्फर्म असे ते आवर्जून सांगतात. नितीन मांजरेकर हे उत्कृष्ट खेळाडू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेल्या क्रिकेटपट्टुंमध्ये त्यांचा सामावेश होतो. क्रिकेटशी संबंधित प्रत्येक गोष्टींचा त्यांचा अभ्यास आहे. नितीन मांजरेकर यांच्यासोबत चर्चेला बसला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटच्या संबंधित सर्व गोष्टींचा तुम्हाला ते उलघडा करतील. व्हिएमसी हे नाव कसे पडले? क्रिकेट मँचच्या वेळेस दुपारचे जेवण का बंद झाले? खेळाडू स्व. निलेश केळुसकर यांना वाऱ्याच्या दिशेने फलंदाजी करायला सांगणे यासारखे अनेक किस्से नितीन यांच्या अनोख्या शैलीत ऐकायलाच हवे. नि...

आमचे सामंत सर........

 आठवी ते दहावी या कालावधीत सामंत सर आम्हाला भंडारी हायस्कूलमध्ये गणित हा विषय शिकवायचे. गणित हा विषय माझा नावडता विषय. आजही गणिते सोडवताना मला तणाव येतो. परंतु सामंत सरांच्या शिकवणीच्या पद्धतीमुळे गणित, भूमिती विषयाची थोडीफार आवड निर्माण झाली होती. तीन वर्षात सामंत सरांची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये पाहता आली. सामंत सरांचे अक्षर अतिशय सुंदर आहे. सामंत सरांची स्टायलिश सही वहीवर घेण्यासाठी आम्ही सर्व मित्र मैत्रिणी भंडारी हायस्कूलच्या स्टाफरुममध्ये रांगा लावत असू. कितीही गर्दी असली तरी सामंत सर प्रत्येकाची गणिताची वही तपासून काळ्या जेल पेनने सही करत असत. सामंत सर वर्गात येतानाच एक अनोखा उत्साह घेऊन वर्गात येत असत. सरांना वर्गात खुर्चीवर बसलेले आम्ही पाहिले नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बेंचकडे जाऊन गणिते समजावणे हे सरांचे वैशिष्ट्य. सर वर्गात फळ्यावर गणित सोडवून पूर्ण फळा भरुन टाकत. सरांची फळ्यावर गणिते सोडविण्याची पद्धत, फलकलेखन यामुळे सरांची मुलांमध्ये वेगळीच क्रेझ होती. नववीत असताना आम्ही सर्व मित्र रविवारी गणिते सोडविण्यासाठी सायकलने देवबाग येथील सामंत सरांच्या घरी गेलो होतो. सकाळी...

बार्टीचा समतादूत प्रकल्प

 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे अंतर्गत महाराष्ट्रात २०१५ पासून समतादूत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील तालुक्यात समतादूत कार्यरत आहेत. गेली पाच वर्षे हे समतादूत महाराष्ट्रात समता प्रबोधनाचे कार्य अविरतपणे करीत आहेत. समतादूतांच्या समताप्रबोधनामुळे राज्यात समतेचा विचार गावापासून महानगरापर्यंत पोहचत आहे.  भारतीय संविधानातील स्वांतत्र्य, समता, न्याय, बंधुत्व ही मूल्ये प्रबोधनाच्या माध्यमातून शाळा, म हाविद्यालये, गाव, वाड्या, वस्त्या, शहरे, महानगरे यांमधील नागरिकांपर्यंत पोहचविणे हा समातादूत प्रकल्पाचा मुख्य उद्देश  आहे. त्याचबरोबर भारतातील थोर संत, महापुरुष, समाजसुधारक यांचे विचार सर्व समाजघटकापर्यंत पोहचवणे हा देखील प्रकल्पाचा उद्देश आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 या कायद्याची माहिती देणे, समाजातील जातीय दुर्भावना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे, बार्टीने नेमून दिलेली सर्वेक्षणाची कामे करणे समतादूत प...