दिवसभरातून एक दोनदा तरी ठळक काय? हे वाक्य आमच्या कानावर पडते. जिल्ह्यात आणि तालुक्यात काय घडत आहे? हे जाणून घेण्यासाठी आमचे मित्र आणि लोकमान्य शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी नितीन मांजरेकर नेहमीच उत्सुकत असतात. तरुण भारत या दैनिकावर नितीन मांजरेकर यांचे निस्सीम प्रेम आहे. कधीपासून वाचतय तरुण भारत म्हायत आसा तुका? असे ते आम्हाला आवर्जून सांगत असतात. दै. तरुण भारतमधल्या बातमी शिवाय ते कोणत्याही बातमीवर ते विश्वास ठेवत नाही. तरुण भारतला इली ना बातमी, मग कन्फर्म असे ते आवर्जून सांगतात. नितीन मांजरेकर हे उत्कृष्ट खेळाडू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेल्या क्रिकेटपट्टुंमध्ये त्यांचा सामावेश होतो. क्रिकेटशी संबंधित प्रत्येक गोष्टींचा त्यांचा अभ्यास आहे. नितीन मांजरेकर यांच्यासोबत चर्चेला बसला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटच्या संबंधित सर्व गोष्टींचा तुम्हाला ते उलघडा करतील. व्हिएमसी हे नाव कसे पडले? क्रिकेट मँचच्या वेळेस दुपारचे जेवण का बंद झाले? खेळाडू स्व. निलेश केळुसकर यांना वाऱ्याच्या दिशेने फलंदाजी करायला सांगणे यासारखे अनेक किस्से नितीन यांच्या अनोख्या शैलीत ऐकायलाच हवे. नितीन मांजरेकर यांचा मित्र परिवार मोठा आहे. त्यांना मित्र परिवारात रमायला आवडते. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. नितीन मांजरेकर हे त्यांच्या प्रत्येक कामात परफेक्ट आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही परफेक्शन हव याकडे त्यांचे लक्ष असते. लोकमान्यच्या कार्यक्रमाची बातमी दिल्यावर त्यात कोणतीही कमतरता राहू नये याकडे त्यांचे लक्ष असते. वाक्याची शब्दरचना कशी आहे? याकडेही ते बारकाईने लक्ष देतात. परंतु याचबरोबर ते एखाद्याकडून नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठीही आवर्जून उत्सुक असतात. मालवणचा स्पीडस्टार दर्शन बांदेकर याची न्यूज तयार करताना नितीन यांची मला मदत झाली. दर्शनची बातमी करताना बाँलरच्या अँंगलने तयार केली होती. पण नितीन यांच्याशी चर्चा केल्यावर दर्शनची फलंदाजी कशी तडाखेबंद होती याची माहिती मला मिळाली. जिल्ह्यात सर्वात लांब षटकार दर्शन बांदेकरने मारल्याचे मला नितीन यांच्याकडून समजले. त्यामुळे त्या बातमीत मला दर्शनचा उल्लेख अष्टपैलू असा करता आला. नितीन मांजरेकर यांच्याकडून सातत्याने नवनवीन गोष्टी शिकता येतात. त्यांच्या ठळक काय? या प्रश्नामुळे आम्हालाही अपटेड रहावे लागते. नितीन मांजरेकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा