देशात एखादी घटना घडल्यानंतर आपण विशिष्ट विचाराच्या चष्म्यातून त्या घटनेकडे बघतो. त्या घटनेला त्याच विचारात बांधतो. परंतु आता हे बदलण्याची गरज आहे. समाजात घडलेल्या घटनांना संविधानाच्या दृष्टीकोनातून बघायला हवे. त्यामुळे संविधानाने आपल्याला काय दिले हे समजेल. संविधान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले तर देशातील नागरिक ते समजावून घेतील. त्यामुळे संविधान समजावून देण्यासाठी समाजातील नागरिकांशी संवाद साधूया असे आवाहन लोकराजा राजर्षी शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी येथे केले. बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत, फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने बॅ. नाथ पै सेवांगण येथे संविधान समजून घेण्यासाठी संविधान संवाद या एकदिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅङ देवदत्त परूळेकर, फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष आनंद मालवणकर, सचिव संजय जाधव, अमोल पाटील, स्नेहल माळी, संग्राम कासले, संजय आचरेकर, संजय वराडकर आदि उपस्थित होते. श्री. परूळेकर म्हणाले, भारतीय संविधान ...