बुधवारी पहाटे भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका जुली जॉन फर्नांडिस यांचे निधन झाले. याच महिन्यात मॅडम मला दोन वेळा भेेेेेटल्या होत्या. मॅडमच अचानक निघून जाणे ही मनाला न पटणारी गोष्ट आहे. परंतु मॅडम आज आपल्यात नाहीत ही सत्य गोष्ट आहे. भंडारी हायस्कूलमध्ये आम्ही पाचवी बमध्ये असताना फर्नांडिस मॅडम या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या चोडणेकर मॅडम. त्यामुळे विद्यार्थी त्यांना चोडनेेकर मॅडम आणि फर्नांडिस मॅडम या दोन्ही नावाने हाक मारत. पाचवीत असताना मॅडम आम्हाला मराठी विषय शिकवायच्या. विषय कोणताही असो मॅडमच्या बोलण्यात अस्खलित मालवणी शब्द असायचेच. मॅडम जेवढ्या प्रेमळ होत्या तेवढ्याच त्या शिस्तप्रिय होत्या. आम्ही वर्गात किंवा बाहेर जरा जरी मस्ती करताना दिसलो तरी मॅडम आम्हाला कासल्या गावकरा घराकडे सांगतलय. अशा शब्दात त्या दटावणी द्यायच्या. पाचवीत असताना आमची सहल आंबोलीला जायचे निश्चित झाले होते. यावेळी आमच्यामधील काही विद्यार्थ्यांकडे सहलीला जाण्यासाठीचे पैसे नव्हते. त्यावेळी सहलीला जाण्याचे 75 रुपये फर्नांडिस मॅडम यांनी भरले होते. ह्या एकाच उदाहरणातून मॅडमचे मुलांविषयी असणार प्रेम व आपुलकीचं नातं दिसून येत. मॅडम दरवर्षी दैनिक तरुण भारतच्या ऑफिसमध्ये मुलीच्या स्मृतिदिनाची जाहिरात देण्यासाठी येत असत. त्यावेळी मॅडम दिलखुलास बोलत. याव्यतिरिक्त बाजारात येता जाता महिन्यातून एकदा मॅडमची भेट होतच असे. किती दुःख असलं तरी आपल्या चेहऱ्यावर जाणून दिलं नाही. मॅडमच्या आठवणी यानंतरही आमच्या सोबत कायम असतील.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा