मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 26 जून ते 20 जुलै या कालावधीत  राज्यात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेसाठी 'सामाजिक सुधारणांचे अग्रदूत लोकराजा राजर्षी शाहू' महाराज, 'छत्रपती शाहू महाराजांचे शेतीविषयक धोरण' असे विषय देण्यात आले आहेत. विजेत्यांना अनुक्रमे 1000, 700, 500 अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, स्पर्धेसाठी शब्द मर्यादा 750 शब्दांपर्यंत राहील. स्पर्धकांनी निबंध स्वहस्ताक्षरात लिहून किंवा टाईप करून संग्राम कासले 9420824874, सुजित जाधव 9422921882 यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर 30 जून पर्यंत पाठवावेत असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे.