छत्रपती शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 26 जून ते 20 जुलै या कालावधीत राज्यात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेसाठी 'सामाजिक सुधारणांचे अग्रदूत लोकराजा राजर्षी शाहू' महाराज, 'छत्रपती शाहू महाराजांचे शेतीविषयक धोरण' असे विषय देण्यात आले आहेत. विजेत्यांना अनुक्रमे 1000, 700, 500 अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, स्पर्धेसाठी शब्द मर्यादा 750 शब्दांपर्यंत राहील. स्पर्धकांनी निबंध स्वहस्ताक्षरात लिहून किंवा टाईप करून संग्राम कासले 9420824874, सुजित जाधव 9422921882 यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर 30 जून पर्यंत पाठवावेत असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा