आजच्या लेखाची सुरुवात मी गुरुवर्य या नावाने करत आहे. गुरुवर्य या नावाने करणामागे विशिष्ट हेतू आहे. भंडारी हायस्कूलमध्ये असताना बी. डी. बनसोडे सर रानडे सरांना गुरुवर्य संबोधत. आज मी व पौर्णिमा हिने गुरुवर्य रानडे सर यांची भेट घेतली. रानडे सर मराठी, संस्कृत, इंग्रजी विषय शिकवायचे. माझे मराठी सुधारण्यात रानडे सरांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. सरांची भेट घेतल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भंडारी हायस्कूलमधील शिक्षक, विद्यार्थी यांच्याबाबत सर दिलखुलास बोलले. बनसोडे सर, फर्नांडिस मॅडम यांच्याविषयी बोलताना सर काहीसे भावूक झाले. सरांनी त्यांचे दिवसाचे शेड्युल कशाप्रकारे असते.याबाबत माहिती दिली. सर पूर्वी होते तसेच आजही आहेत. सरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही हे सरांचं वेगळेपण मला जाणवले. सर अजूनही कीर्तन करतात. सरांनी संत गाडगेबाबांचे कीर्तनाबाबत माहिती दिली. यावेळी खारेपाटण येथील कीर्तनाच्या प्रसंगाबाबत सरांशी चर्चा केली. अशा प्रकारची चर्चा होणे मला अतिशय महत्त्वाचे वाटते. बऱ्याच दिवसानंतर अशा प्रकारची चर्चा झाली.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा