बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत, फुले, शाहू आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
'जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी महिलांना काय दिले ?' हा विषय आहे. निबंधासाठी १००० शब्दमर्यादा आहे. विजेत्यांना अनुक्रमे १०००,७००, ५०० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ३०० रुपयाची पारितोषिके व ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी निबंध स्वहस्ताक्षरात लिहून किंवा टाईप करून बॅ. नाथ पै सेवागण मालवण येथे आणून यावेत किंवा व्हॉटस
अप क्रमांक (९४२३९४६००३), sevangan.malvan@gmail.com क्रमांकावर पाठवावेत येथे ६ एप्रिल पर्यंत पाठवावेत. स्पर्धेतील विजेत्यांना ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बॅ. नाथ पै सेवागण येथे होणाऱ्या सलग वाचन उपक्रमाप्रसंगी पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा