ग्लोबल मालवणीचे सदस्य आणि स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यापीठ प्रतिनिधी सुधीर जनार्दन आचरेकर यांचे सोमवारी मुंबई येथे निधन झाले. सुधीर आचरेकर यांचे अचानक जाणे हे सर्वांसाठी धक्कादायक होते. ग्लोबल मालवणी आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनात सुधीर आचरेकर हे नेहमीच आघाडीवर असायचे. आम्ही स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात असताना एनसीसी त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात ते आवर्जून उपस्थित असायचे. माजी विद्यार्थ्यांना मदत करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नेहमीच दिसून यायची. सुधीर आचरेकर यांच्या जाण्याने त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. सुधीर यांच्याबरोबर माझी फारशी ओळख नव्हती. परंतू सूविधा व विवेक यांना मुलगा झाला. तेव्हा सुधीर हे कुडाळ येथे आले होते. तेव्हाही ते मित्राला मदत करताना दिसत होतेे. नेहमी इतरांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे ते कायम स्मरणात राहतील.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा