आरटीई ऑनलाईन प्रवेश
मुदतवाढीने पालकांमध्ये समाधान बार्टीतर्फे आरटीईचे फॉम विनामूल्य भरण्याची सोय
मालवण सन २०२२-२४ या शैक्षणिक हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकानुसार २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरीता शिक्षण विभागाकडून २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याने पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बार्टीच्या समतादूतामार्फत आरटीई प्रवेशाचे फॉर्म विनामूल्य भरले जात असून पालकांनी तालुक्यातील समतादूतांशी संपर्क साधण्याचे आवाहन समतादूतांमार्फत करण्यात आले आहे.
सन २०२२-२४ या शैक्षणिक हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकानुसार २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी १७ मार्च २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यात विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीत प्रवेश घेणान्या दुर्बल व वंचित घटकामधील विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. परंतु नेटवर्क व सर्वर समस्यांमुळे अनेक पालकांनी १७ मार्चनंतर मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार २५ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत आरटीईचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी पत्राद्वारे दिली आहे.
बाटीमार्फत मोफत फॉर्म भरण्याची सोय
सामाजिक न्याय विभागाची स्वायत संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्यावतीने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म मोफत भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समतादूत प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्याचे फॉर्म विनामूल्य भरत आहे. १७ मार्चपर्यंत सिंधुदुर्ग जिल्यातील समतादूतांनी ७० ऑनलाइन फॉर्म विनामूल्य भरले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९ शाळांमध्ये २८७ आरटीई प्रवेशाच्या जागा आहेत ज्या पालकांना आरटीई प्रवेशाचे फॉर्म विनामूल्य भरायचे आहेत. त्यांनी तालुक्यातील समतादूतांशी संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा